नवी दिल्ली: एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वापर यामुळे आगामी काळात अनेक नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः पुढील 5 वर्षांत, डेटा एंट्री, टेलिकॉलिंग आणि ग्राहक सेवा यांसारख्या 3 महत्त्वाच्या क्षेत्रांतील लाखो नोकऱ्या एआईमुळे संपुष्टात येणार आहेत. या नोकऱ्या कालबाह्य होणार असल्याचा इशारा एका अलीकडील अहवालात देण्यात आला आहे.
भारतातही गेल्या काही वर्षांत एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे. टेक कंपन्यांनी आधीच एआयवर आधारित टूल्स आणि चॅटबॉट्स वापरण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेमुळे कंपन्यांना कामासाठी लागणारा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होतो. परिणामी, मानव संसाधनांची गरज घटत चालली आहे. या बदलांचा परिणाम म्हणून, भविष्यात हजारो लोक बेरोजगार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - चीनचा आता मानव आणि यंत्रांना 'एकत्र' करण्याचा प्रयत्न; AI शर्यतीत सर्वांत पुढे राहण्याची महत्त्वाकांक्षा
AI मुळे 'या' 3 नोकऱ्या संकटात -
डेटा एंट्री -
पूर्वी ही कामे मॅन्युअली केली जात असत. मात्र, आता एआय काही मिनिटांत मोठे डेटासेट प्रोसेस करू शकते.
टेलिकॉलिंग -
जनरेटिव्ह एआयच्या आगमनानंतर, एआय देखील ग्राहकांना मानवांप्रमाणे उत्तर देऊ शकते. अशा परिस्थितीत, ग्राहक सेवा सेवेमध्ये एआयचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू होईल. यामुळे मानवी टेलिकॉलरची गरज कमी होत आहे.
ग्राहक सेवा -
चॅटजीपीटीसारखी जनरेटिव्ह एआय प्रणाली ग्राहकांच्या चौकशीला क्षणात उत्तर देते. हे उत्तर इतके नैसर्गिक असते की, वापरकर्त्याला ते संगणकाने दिले आहे की माणसाने, हे कळत नाही. त्यामुळे ग्राहक सेवा देणाऱ्या कंपन्यांमधील नोकऱ्या काही दिवसांनी संकटात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - AI तुमच्या बँक बॅलन्सवर लक्ष ठेवून आहे? आवाजाची नक्कल करून फसवणूक करू शकते, सॅम ऑल्टमन यांचा इशारा
दरम्यान, चॅटजीपीटी, Google Gemini, आणि इतर अनेक जनरेटिव्ह एआय टूल्सच्या आगमनानंतर, ग्राहक सेवा, डेटा व्यवस्थापन, रिपोर्ट जनरेशन, रिज्युम रिव्ह्यू अशा अनेक पारंपरिक ऑफिस कामांमध्ये एआयने आपले स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच, TCS सारख्या दिग्गज आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या 2 टक्क्याने कमी केली. त्यामुळे TCS मधील 12 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे.