Wednesday, August 20, 2025 11:16:33 PM

एअर इंडियाच्या 16 विमानांचे मार्ग बदलले; कंपनीने प्रवाशांना केले विशेष आवाहन

इस्रायल आणि इराणच्या हवाई हद्द बंद झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करता, एअर इंडियाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

एअर इंडियाच्या 16 विमानांचे मार्ग बदलले कंपनीने प्रवाशांना केले विशेष आवाहन
Air India Flights Diverted प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

नवी दिल्ली: एअर इंडियाने आज अचानक त्यांच्या 16 उड्डाणांचे वेळापत्रक बदलले. एअर इंडियाने लंडन, न्यू यॉर्क, वॉशिंग्टन आणि कॅनडाला जाणाऱ्या काही उड्डाणे वळवली आहेत. तसेच काही उड्डाणे परत फिरवली आहेत. एअरलाइनने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. कंपनीने पोस्टमध्ये वळवलेल्या किंवा परत फिरवलेल्या उड्डाणांची यादी देखील शेअर केली. इस्रायल आणि इराणच्या हवाई हद्द बंद झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करता, एअर इंडियाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा -  ट्रॅफिकमुळे फ्लाइट चुकली...अन् ती वाचली!! एअरपोर्टवर पोहोचायला 10 मिनिट उशीर झाल्याने वाचला भूमी चौहानचा जीव

एअर इंडियाने 'या' फ्लाइट्सचे वेळापत्रक बदलले - 

AI130 – लंडन हीथ्रो-मुंबई – व्हिएन्नाकडे वळवले आहे
AI102 – न्यू यॉर्क-दिल्ली – शारजाहकडे वळवले आहे
AI116 – न्यू यॉर्क-मुंबई – जेद्दाहकडे वळवले आहे
AI2018 – लंडन हीथ्रो-दिल्ली – मुंबई जेद्दाहकडे वळवले आहे
AI129 – मुंबई-लंडन हीथ्रो – मुंबईकडे परत येत आहे
AI119 – मुंबई-न्यू यॉर्क – मुंबईकडे परत येत आहे
AI103 – दिल्ली-वॉशिंग्टन – दिल्लीकडे परत येत आहे
AI106 – नेवार्क-दिल्ली – दिल्लीकडे परत येत आहे
AI188 – व्हँकुव्हर-दिल्ली – जेद्दाहकडे वळवले आहे
AI101 – दिल्ली-न्यू यॉर्क – फ्रँकफर्ट/मिलानकडे वळवले आहे
AI126 – शिकागो-दिल्ली – जेद्दाहकडे वळवले आहे
AI132 – लंडन हीथ्रो-बेंगळुरू – शारजाहकडे वळवले आहे AI2016 – लंडन हीथ्रो-दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले आहे AI104 – वॉशिंग्टन-दिल्ली – व्हिएन्नाकडे वळवले 
AI190 – टोरंटो-दिल्ली – फ्रँकफर्टकडे वळवले 
AI189 – दिल्ली-टोरंटो – दिल्लीकडे वळवले

हेही वाचा -  Air India Emergency Landing: एअर इंडिया फ्लाइटला बॉम्बची धमकी? फुकेट-दिल्ली एअर इंडिया फ्लाइटची आपत्कालीन लँडिंग

दरम्यान, एअर इंडियाने त्यांच्या अधिकृत X खात्यावर एक पोस्ट लिहिली. यामध्ये, एअरलाइनने म्हटले आहे की प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही समस्या कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, प्रवाशांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. ज्या प्रवाशांना त्रास होत आहे त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाईल. उड्डाण रद्द झाल्यास परतफेड केली जाईल. त्यांच्या गंतव्यस्थानावर जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या फ्लाइटचे वेळापत्रक पुन्हा निश्चित केले जात आहे. 
 


सम्बन्धित सामग्री