बीड : मस्साजोग गावचे सरंपच संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. अठरा दिवस उलटूनही मुख्य आरोपी फरार असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बीडमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो लोकांचा सहभाग आहे. आरोपीला फाशी द्या अशा आशयाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. या मोर्चात छत्रपती संभाजी महाराज, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, पवाराच्या राष्ट्रवादीतील आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित आहेत. संतोष देशमुख यांची निघृण हत्या केल्याने बीडकरांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : महायुतीसमोर बीड प्रकरणाचे आव्हान
बीडमध्ये काय घडलं?
संतोष देशमुखांच्या हत्येनंतर केज, मस्साजोगमध्ये आंदोलन करण्यात आले. हत्येचा तपास करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. देशमुखांची हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खंडणीसाठी आलेल्यांकडून प्रकल्प अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीवेळी सरपंच संतोष देशमुखांनी मध्यस्ती केली. मध्यस्थी केल्यानं देशमुखांची हत्या झाल्याचं संशय व्यक्त होत आहे. आतापर्यंत तीन आरोपी अटकेत तर 4 आरोपींचा शोध सुरु आहे. देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी वाल्मिक कराड यांचे नाव समोर येत आहे. त्यामुळे वाल्मिक कराडांवरुन राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे.