Sunday, August 31, 2025 05:09:38 PM

परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चात नेतेमंडळींचा एल्गार

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं.

परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चात नेतेमंडळींचा एल्गार

परभणी : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं . या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार संजय जाधव,  नरेंद्र पाटील सह अन्य राजकीय नेत्यांची या मोर्चाला उपस्थिती होती. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

'मंत्रीच आता आरोपींना सांभाळत आहेत' 

परभणीतील मोर्चातून मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. देशमुख कुटुबीयांना धक्का लागला तर मुंडेंना फिरू देणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने मंत्रीच आता आरोपींना सांभाळच आहेत अशी जहरी टीका जरांगे पाटलांनी केली आहे. 

'सर्व आरोपींना मकोका लागायला हवा'

अगदी सुरूवातीपासून बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश टीका करत राहिले आहे. लातूरमध्ये झालेल्या मोर्चातही ते उपस्थित होते आणि आज परभणीत झालेल्या मोर्चातही ते उपस्थित होते. कोम्बिंग ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. बीडमध्ये आकासारखे कलाकार मंडळी असल्याची टीका आमदार धस यांनी केली आहे. आमदार सुरेश धस यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का घेतले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आतापर्यंच्या हत्येची बेरीज करा, त्या कोणी घडवून आणल्या, त्याच्या मागचा मास्टरमाईंड कोण? हे जर तुम्हाला माहीत नसेल तर परभणीला आणि बीडला, बारामतीची माणसे पाठवा, असे आवाहन देखील धस यांनी केले आहे. हा सर्व प्रकार केवळ एका समाजापुरता मर्यादित नाही. इतर सर्व समाजाला तिथे काय वागणूक मिळते.  ते पाहा, असे आव्हान देखील सुरेश धस यांनी अजित पवार यांना केले आहे.त्याचबरोबर सर्व आरोपींना मकोका लागायला हवा असही धस यांनी म्हटले आहे. 


'बीडमध्ये गुंडाराज, आकाला उचला'

नरेंद्र पाटील देखील परभणीतील मूकमोर्चात सहभागी झाले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केले आहे. बीडमध्ये गुंडाराज सुरू आहे. या गुंडाराजमध्ये आकाला उचला असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. 

 

'धनंजय मुंडेंनी नैतिकतेने राजीनामा द्यावा'

 
परभणीतील सर्वपक्षीय मूकमोर्चात खासदार संजय जाधवही सहभागी झाले. यावेळी त्यांनी ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे म्हटले आहे. हत्येतील गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे. त्याचबरोबर बिहारलाही लाजवेल अशी परिस्थिती परळीत असल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले आहे. हत्येतील गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे असे वक्तव्य त्यांनी केले आहे. देशमुख हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागले जात आहे. यावेळी जाधव यांनी धनंजय मुंडेंनी नैतिकतेने राजीनामा द्यावा असे म्हटले आहे. 


 


सम्बन्धित सामग्री