नवी दिल्ली: ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. अमेझॉनने दिल्लीमध्ये त्यांची अल्ट्रा-फास्ट डिलिव्हरी सेवा 'Amazon Now' सुरू केली आहे. ही सेवा आधीच बेंगळुरूमध्ये उपलब्ध होती. आता ही सेवा दिल्लीमध्ये देखील सुरू करण्यात आली आहे. 'अमेझॉन नाऊ'चा उद्देश ग्राहकांना फक्त 10 मिनिटांत घरपोहोच वस्तू पोहोचवणे आहे. सध्या, ही सेवा दिल्लीच्या निवडक पिन कोडमध्ये उपलब्ध आहे, परंतु कंपनी लवकरच ती अधिक शहरांमध्ये विस्तारित करण्याची योजना आखत आहे.
ग्राहकांना कसा होणार फायदा?
Amazon Now प्रत्यक्षात अमेझॉनच्या अॅपमध्येच एक स्वतंत्र विभाग म्हणून उपलब्ध आहे. येथे ग्राहक फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, स्नॅक्स आणि इतर किराणा सामान ऑर्डर करू शकतात. या वस्तू ग्राहकांना फक्त 10 मिनिटांत घरपोहोच मिळणार आहेत. ही सेवा जलद डिलिव्हरीसाठी विशेषतः डिझाइन केलेल्या स्थानिक डिलिव्हरी हब आणि मायक्रो-हाऊसिंग सिस्टमवर आधारित आहे. ती Zepto, Blinkit आणि Swiggy Instamart सारख्या आधीच अस्तित्वात असलेल्या जलद डिलिव्हरी कंपन्यांशी थेट स्पर्धा करणार आहे.
हेही वाचा - मोठी बातमी! सरकारकडून स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यास मिळाला परवाना
दरम्यान, अमेझॉनने यापूर्वी बेंगळुरूमध्ये ही सेवा सुरू केली होती. तथापी, कंपनीला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे अमेझॉनला खूप सकारात्मक संकेत मिळाले आहेत, असे अमेझॉनने म्हटले आहे. म्हणूनच ही सेवा आता दिल्लीत सुरू करण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की सुरुवातीच्या ग्राहकांच्या प्रतिसादामुळे कंपनी या सेवेचा विस्तार करण्यास खूप उत्साही आहे. लवकरच ही सेवा इतर शहरांमध्येही सुरू केली जाईल.
हेही वाचा - अमेझॉनवर वस्तू खरेदी करणे झाले महाग! कंपनी आता आकारणार मार्केटप्लेस फी
अमेझॉन नाऊच्या प्रवेशामुळे क्विक कॉमर्स मार्केटमध्ये स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. भारतात क्विक कॉमर्सची बाजारपेठ दरवर्षी वेगाने वाढत आहे. 2023-24 मध्ये ही बाजारपेठ सुमारे 30 हजार कोटी रुपयांची होती, तर 2024-25 मध्ये ही संख्या 64 हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे.