Thursday, August 21, 2025 01:59:51 AM

Beed Murder Case: बीडमधील मोर्चातून जरांगेंचा सरकारवर निशाणा

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला.

beed murder case बीडमधील मोर्चातून जरांगेंचा सरकारवर निशाणा

बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. बीडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडक चौकातून हा मूक मोर्चा काढण्यात आला होता.  या मोर्चात हजारोंच्या संख्येंने नागरिकांची उपस्थिती होते. या मोर्चात आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजी महाराज, खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित राहिले होते.

बीडमध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लक्ष वेधले. मनोज जरांगे स्टेजवर न बसता हजारोंच्या गर्दीत बसले होते. यावेळी स्टेवरील नेत्यांनी मनोज जरांगे यांना स्टेजवर येण्यास सांगितले. त्यावेळी जरांगे हजारोंच्या गर्दीतून वाट काढत स्टेजवर आले. स्टेजवर येऊन ते खुर्चीवर न बसता खाली बसले. त्यावर सर्व नेतेमंडळींनी त्यांना खुर्चीवर बसण्यास सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

'संतोष देशमुख भैय्यांना न्याय दिल्याशिवाय मराठा मागे हटणार नाही'

मनोज जरांगे यांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे. हे प्रकरण दबु देणार नाही असा इशारा दिला आहे. संतोष देशमुख भैय्यांना न्याय दिल्याशिवाय मराठा मागे हटणार नाही. या प्रकरणात कुणीही राजकारण करू नये. महायुती असो किंवा महाविकास आघाडी कुणीही राजकारण करू नये. लाज वाटू द्या. तुम्हा दोघांमुळे हाल होऊ लागले आहेत. काही मंत्री आहेत. तर काही विरोधी पक्षातील आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत.  हे आरोप प्रत्यारोप करणे बंद करा. गृहमंत्री या प्रकरणात हलगर्जीपणा करू नये. आरोपींना शोधून आणा असे जरांगेंनी म्हटले आहे.  24-24 तासात आरोपी सापडत असतो. तुम्हाला 19 दिवसात आरोपी सापडत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालत आहेत. आरोपींना सांभाळण्याचे काम ते करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

 

हेही वाचा : Deshmukh Murder Case: बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

 

'आम्ही सर्व आमदारांच्या पाठीशी'

जातीवर अन्याय करणाऱ्यांना मी सोडत नाही. न्याय मिळाल्याशिवाय मी हटणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे.  माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. त्याचबोरबर  सुरेश धस एकटे सर्वांना काफी आहेत असे म्हणत जरांगे यांनी आमदार सुरेश धस यांना पाठिंबा दिला आहे.  आम्ही सर्व आमदारांच्या पाठीशी आहोत. जनतेला धक्का लागू देणार नाही असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

 

 

 


सम्बन्धित सामग्री