Wednesday, August 20, 2025 10:41:38 AM

Axis Bank बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ATM मधून वारंवार पैसे काढणे महागणार

जर एखाद्या ग्राहकाने दरमहा मोफत एटीएम व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्याला प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर 23 रुपये शुल्क भरावे लागेल. आतापर्यंत हे शुल्क 21 रुपये होते.

axis bank बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी atm मधून वारंवार पैसे काढणे महागणार
Axis Bank ATM
Edited Image

नवी दिल्ली: अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अॅक्सिस बँकेने एक मोठा बदल जाहीर केला आहे. 1 जुलै 2025 पासून बँक त्यांच्या एटीएम व्यवहार शुल्कात वाढ करत आहे. हा बदल बचत खाती, एनआरआय खाती आणि ट्रस्ट खात्यांसह अनेक प्रकारच्या खात्यांना लागू होईल. जर एखाद्या ग्राहकाने दरमहा मोफत एटीएम व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्याला प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर 23 रुपये शुल्क भरावे लागेल. आतापर्यंत हे शुल्क 21 रुपये होते. म्हणजेच आता प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर 2 रुपये अधिक द्यावे लागतील. बँकेचे हे नवीन दर अ‍ॅक्सिस बँक आणि इतर बँकांच्या एटीएमवर लागू होतील.

हा बदल 1 मे 2025 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे लागू केलेल्या सुधारित एटीएम इंटरचेंज फी मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत आहे. आरबीआयने दरमहा ग्राहक किती मोफत एटीएम व्यवहार करू शकतो याची कमाल संख्या देखील निश्चित केली आहे. यानुसार, महानगरांमध्ये दरमहा 3 मोफत एटीएम व्यवहार, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये दरमहा 5मोफत एटीएम व्यवहार करण्यास परवानगी असणार आहे. या मर्यादेनंतर, रोख रक्कम काढणे किंवा शिल्लक तपासणी यासारख्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी शुल्क आकारले जाईल.

हेही वाचा - महत्वाची बातमी: 1 जूनपासून यूपीआय ते एलपीजीपर्यंत आर्थिक व्यवस्थेत होणार मोठे बदल; काय आहे नवीन नियमावली? जाणून घ्या

एटीएम इंटरचेंज फी म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या बँकेव्यतिरिक्त दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढता तेव्हा तुमची बँक त्या दुसऱ्या बँकेला इंटरचेंज फी देते. कधीकधी हे शुल्क ग्राहकाकडून आकारले जाते, विशेषतः जेव्हा तुम्ही एटीएमचा वापर मोफत मर्यादेपेक्षा जास्त करता. उदाहरणार्थ, जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल आणि एसबीआय एटीएममधून चौथ्यांदा पैसे काढले तर तुमच्या खात्यातून अतिरिक्त शुल्क कापले जाऊ शकते.

हेही वाचा - ATM मधून PF चे पैसे कसे काढायचे? जाणून घ्या प्रक्रिया

डिजिटल बँकिंगचा वापर वाढवणे -  

दरम्यान, SBI ने 1 फेब्रुवारी 2025 पासून त्यांच्या खात्यांमध्ये ठेवलेल्या सरासरी मासिक शिल्लक (AMB) वर आधारित, त्यांच्या ग्राहकांसाठी मोफत एटीएम व्यवहारांची संख्या मर्यादित केली आहे. तथापि, ग्राहकांना अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी त्यांच्या मोफत व्यवहार मर्यादेत एटीएम वापरण्याचा किंवा UPI, नेट बँकिंग इत्यादी डिजिटल बँकिंगचा वापर वाढवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
 


सम्बन्धित सामग्री