Thursday, August 21, 2025 02:11:06 AM

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! पक्षाच्या प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश

मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एक महत्त्वाची व्यक्ती मानल्या जाणाऱ्या संजना घाडी माजी नगरसेविका आहेत आणि त्यांनी पक्षात उपनेतेपद भूषवले आहे.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का पक्षाच्या प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश
Sanjana Ghadi Join Shinde Sena
Edited Image

मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना (यूबीटी) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती, माजी नगरसेवक संजय घाडी यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

हेही वाचा - पुणे निधीवाटपावर श्वेतपत्रिका काढा; कोल्हेंचे अजित पवारांना खुले आव्हान

संजना घाडी यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश -  

मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एक महत्त्वाची व्यक्ती मानल्या जाणाऱ्या संजना घाडी माजी नगरसेविका आहेत आणि त्यांनी पक्षात उपनेतेपद भूषवले आहे. अलिकडेच, शिवसेना (यूबीटी) ने अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये सुरुवातीला त्यांचे नाव वगळण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या असंतोषाबद्दल अटकळ निर्माण झाली होती. अखेर त्यांचे नाव शेवटच्या क्षणी जोडले गेले असले. परंतु, त्या पक्षाच्या अंतर्गत निर्णयांवर नाराज होत्या.

हेही वाचा - 'शाहांकडून वारंवार शिवरायांचा एकेरी उल्लेख' संजय राऊतांचा गंभीर आरोप

संजना घाडी या मुंबईतील शिवसेना ठाकरे गटातील एका महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. संजना घाडी यांचा शिंदे गटातील प्रवेश बीएमसी निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा बदल मोठा धक्का मानला जात आहे. कारण संजना घाडी यांच्यासोबतच शेकडो शिवसेना यूबीटी कार्यकर्ते शिंदे गट शिवसेनेत सामील झाले आहेत. महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना, अशा हाय-प्रोफाइल नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आता उद्धव ठाकरे यांना मोठे राजकीय नुकसान सहन करावे लागणार आहे. 


सम्बन्धित सामग्री