Wednesday, August 20, 2025 12:45:53 PM

सावधान! ज्योतिषशास्त्र म्हणते, अशी कुंडली असणाऱ्या मुला-मुलींचा काही भरवसा नाही!

नाते मैत्रीचे असो, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसीचे असो किंवा कुटुंबीयांतील; ते विश्वासावर टिकते. तो संपला की नातेही संपते. ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे की, कुंडलीतील ग्रहस्थितीचा यावर परिणाम होतो.

सावधान ज्योतिषशास्त्र म्हणते अशी कुंडली असणाऱ्या मुला-मुलींचा काही भरवसा नाही

Astrology News : वेगवेगळ्या स्वार्थांमुळे माणसाचा माणसावर विश्वास राहू नये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकजण माणसांपेक्षा मुके प्राणी अधिक प्रेमळ आणि विश्वासाचे वाटू लागले आहेत, असे बोलताना दिसतात. पण माणूस समाजात राहणारा प्राणी असल्यामुळे इतर माणसांशी संबंध येणे आणि नाती-गोती असणे, नवीन नाती बनवणे ही बाब सामान्य आहे. या नात्यांमध्ये विश्वास ही बाब खूप महत्त्वाची असते. ज्योतिषशास्त्रातही माणसांच्या वेगवेगळ्या स्वभावांविषयी सांगितले आहे. जोडीदार निवडताना या गोष्टींचा आजही बारकाईने विचार केला जातो.

कोणतेही नाते विश्वासावर टिकते, मग ते मैत्रीचे असो, पती-पत्नीचे असो, प्रियकर-प्रेयसीचे असो किंवा कुटुंबीयांतील. विश्वास संपला की नातेही संपते. एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जुळवणे खूप कठीण असते. पण काही वेळा व्यक्ती चुकीची नसतानाही तिच्यावर अविश्वास केला जातो. तर, काही वेळा अविश्वासू माणसे बेमालूमपणे खरा वाटावा, असा चेहरा धारण करून फिरत असतात. अनेकदा ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक यामागे व्यक्तीच्या स्वभावापेक्षा तिच्या जन्मकुंडलीतील ग्रहांच्या विशेष स्थितीचा मोठा हात असतो, असं सांगतात.

हेही वाचा - काकाशी भांडण करण्यामुळे शनिदेव होतात नाराज! फक्त एवढं करा.. मग काही अडचण येणार नाही

कोणते ग्रह ठरतात कारणीभूत?
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ, शुक्र आणि चंद्र हे ग्रह व्यक्तीच्या स्वभाव आणि वर्तनावर विशेष प्रभाव टाकतात. मंगळ हा उग्र आणि पापग्रह मानला जातो. तो इतर ग्रहांसोबत मिळून अनैतिक संबंधांची प्रवृत्ती वाढवतो. शुक्र हा प्रेम, आकर्षण आणि लैंगिकतेचा प्रतिनिधी असतो, तर चंद्र हा मानसिकतेचा कारक ग्रह आहे. या तीन ग्रहांची विशिष्ट संयोजन असेल, तर व्यक्ती नकळत चुकीच्या मार्गाला वळते, असे ज्योतिषशास्त्र सांगते. अर्थात, यामध्ये या व्यक्तीवर लहानपणापासून झालेले संस्कारही तितकीच महत्त्वाची भूमिका वठवतात.

अशा व्यक्तींबाबत सावध रहा
मंगळ कन्या राशीत असल्यास, संबंधित मुलींच्या वर्तनाबाबत संशय घेतला जातो. समाज त्यांना विश्वासघातकी समजतो. असे असू किंवा नसूही शकते. शुक्र आणि मंगळ एकाच राशीत असल्यास, त्या व्यक्तीचे गुप्त प्रेमसंबंध अनेक वेळा असू शकतात. जर लग्नस्थानी असलेली रास पापग्रहांच्या संयोगाने 12 व्या भावात पोहोचत असेल, तर अशा मुली सहजपणे परपुरुषांकडे आकर्षित होतात. कन्या लग्नात मंगळ आणि सातव्या भावात शुक्र असल्यास, संबंधित मुलींचे एकापेक्षा अधिक प्रियकर असण्याची शक्यता असते. चंद्र आणि शुक्र एकाच राशीत असल्यास, असे पुरूष विश्वासघात करण्याची शक्यता अधिक असते.

सप्तम भावात अशुभ ग्रह असल्यास, विवाहपूर्व विश्वासघात किंवा विवाहास नकार देण्याची शक्यता वाढते. राहू अशुभ असल्यास, व्यक्ती फसवणूक करणारा, खोटारडा आणि आत्मकेंद्रित होतो. यामुळे तो योग्य मार्गाने यश न मिळाल्यास चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करतो. जर मुलींच्या कुंडलीत राहू अशुभ असेल, तर काही वेळा त्या सरळ मार्गाने यश मिळत नाही असे पाहून किंवा हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी शरीराचा वापर करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. केतूचा प्रभाव असल्यास, व्यक्ती कठोर, तुटक स्वभावाचा आणि वाईट वागणुकीचा होतो. अशा व्यक्ती प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस चुकीचे कृत्य करतात. पण या सर्व शक्यता आहेत. परिस्थितीनुसार आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या पार्श्वभूमीनुसार यात फरक असू शकतो.

हेही वाचा - मुस्लीम असूनही नुसरतने केलं 16 शुक्रवारचं व्रत! केदारनाथ-बद्रीनाथलाही गेली.. म्हणते, 'माझ्या आतला आवाज..'

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री