Wednesday, August 20, 2025 09:30:34 AM

Chanakya Niti : तुमच्या प्रियकर/प्रेयसीचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का? फसवणूक करणारी व्यक्ती कशी ओळखाल?

आजकाल नात्यात फसवणूक होण्याचे बरेच प्रकार समोर आले आहेत. याचे लगेच होणारे आणि दीर्घकालीन होणारे परिणाम अनेकदा खूप गंभीर असतात. त्यामुळे, अनेकांच्या मनात नातेसंबंधांविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

chanakya niti  तुमच्या प्रियकरप्रेयसीचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का फसवणूक करणारी व्यक्ती कशी ओळखाल

Chanakya Niti In Marathi : हल्ली प्रेम आणि विवाहाच्या नात्यात अनेक मुलांची आणि मुलींची फसवणूक होत असल्याचं पाहायला आणि ऐकायला मिळतंय. याच्यामुळे अनेकांच्या मनात धास्ती आहे. कारण, अशा फसवणुकीत होणारे नुकसान कधी-कधी खूप मोठे आणि भरून न येणारे असते. शिवाय, मानसिक आणि भावनिक नुकसान होते, ते वेगळेच.. यामुळे अनेकदा लोक नैराश्यात जातात आणि काही जण आत्महत्या देखील करतात. आचार्य चाणक्य यांनी तर या फसव्या व्यक्तींना कसं ओळखायचं हे सांगितलं आहे.

प्रेमाच्या नात्यात , फसवणूक करणारी व्यक्ती कशी ओळखायची, याबद्दल आचार्य चाणक्यांनी सांगितलं आहे. चाणक्यनीतीत याचे 3 संकेत दिले आहेत. ते जर समजून घेतले, तर फसवणूक टाळली जाण्याची शक्यता वाढेल. जी व्यक्ती तुमच्या समोर गोड बोलतो पण तिच्या मनात तुमच्याबद्दल नकारात्मक विचार असतात ती सापापेक्षाही धोकादायक असते, असे आचार्य चाणक्यांनी म्हटले आहे. नात्यात कोण खरं प्रेम करतं आणि कोण फसवणूक करतं हे ओळखण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी 3 संकेत सांगितले आहेत. चाणक्यीतीत याचा उल्लेख आहे. या बाबी लक्षात घेतल्यास भविष्यातले मोठे नुकसान टळू शकते.

हेही वाचा - Chanakya Niti : जी व्यक्ती या गोष्टी समजून घेत नाही, तिच्या पदरी सुख-समाधान नाहीच

- जर तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यासमोर तुमचं कौतुक करत असेल पण जेव्हा तुम्ही नसता, तेव्हा तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल. तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे.
- प्रेमाची खरी परीक्षा कठीण काळात होते. जो माणूस कठीण प्रसंगी किंवा तुमच्या दुःखाच्या वेळी तुम्हाला एकटं सोडतो आणि सगळं काही ठीक झाल्यावर पुन्हा तुमच्या येतो, तो तुमचा खरा मित्र किंवा जोडीदार असू शकत नाही. खंबीरपणे पाठिशी उभे राहण्याच्या किंवा खूप गरजेच्या वेळी तुमचा प्रियकर/प्रेयसी गायब झाली आणि संकट गेल्यावर ती परत आली तर, हे प्रेम नाही. तर, हा स्वार्थ आहे.
- जर तुमची गर्लफ्रेंड तुमच्या वैयक्तिक गोष्टी इतरांसोबत शेअर करत असेल, तर तेही योग्य नाही. नात्यात निष्ठेचा अभाव असल्याचं स्पष्ट लक्षण आहे. अशा नात्याचा शेवट विश्वासघातात होईल.

याशिवाय, विनाकारण खोटे बोलणे, सतत खोटे बोलणे, दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असलेले समोर येणे, वारंवार रागात बोलणे आणि अपशब्द वापरणे, आक्रमक होणे, तुमचा किंवा तुमच्या कुटुंबाचा किंवा इतर चांगल्या व्यक्तींचा अनादर करणे हेही लक्षण चांगले नाही. अशी माणसे विश्वासपात्र नसतात. अशा व्यक्तींसोबत नात्यात असणे किंवा बऱ्याच काळासाठी त्यांच्या चुकांना माफ करून त्यांच्यासोबत राहणे एखाद्या दिवशी मोठ्या संकटाचे कारण बनू शकते.

हेही वाचा - Chanakya Niti : एकटे राहण्याची भीती वाटते? सुचेनासं होतं? चाणक्यनीतीत सांगितलेत एकटे असण्याचे फायदे

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही.)


सम्बन्धित सामग्री