Wednesday, August 20, 2025 09:14:36 AM

Chanakya Niti : चाणक्यांनी सांगितलेत नाती सुखद बनवणारे 5 नियम; मोडले तर मात्र काही खरं नाही..

Chanakya NIti : नातेसंबंध कधी गोडवा निर्माण करतात तर कधी कटुता.. चाणक्यांनी समाजातील हे सर्व नातेसंबंध महत्त्वाचे मानले आहेत. यामुळेच त्यांनी नातेसंबंधांचे काही नियम सांगितले आहेत.

chanakya niti  चाणक्यांनी सांगितलेत नाती सुखद बनवणारे 5 नियम मोडले तर मात्र काही खरं नाही

Chanakya Niti About Relations : समाजात राहताना कोणत्याही माणसाला वेगवेगळ्या नातेसंबंधांच्या माध्यमामधून इतरांशी जोडले जाणे अनिवार्य असते. हे नातेसंबंध कधी गोडवा निर्माण करतात तर कधी कटुता.. चाणक्यांनी समाजातील हे सर्व नातेसंबंध महत्त्वाचे मानले आहेत. यामुळेच त्यांनी चाणक्य नीतीमध्ये नातेसंबंधांचे काही नियम सांगितले आहेत. यातील 5 नियम आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत. हे नियम तुमचं जीवन बदलू शकतात. याउलट, ते नियम मोडणं म्हणजे आनंद आणि शांती गमावणं. 

एखाद्याशी नातं निर्माण करणं खूप सोपं आहे. पण ते आयुष्यभर टिकवणं खूप कठीण आहे. आचार्य चाणक्य यांनी नात्यांबद्दल सांगितलेले हे नियम आजच्या युगातही खूप प्रासंगिक आणि सयुक्तिक आहेत. जर कोणी हे नियम मोडले तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही.

हेही वाचा - Chanakya Niti : तुमच्या प्रियकर/प्रेयसीचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का? फसवणूक करणारी व्यक्ती कशी ओळखाल?

पहिला नियम
चाणक्य म्हणतात की, कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर आधारित असतो. जर विश्वास एकदा तुटला, तर ते नातं कधीच पूर्वीसारखं राहू शकत नाही. म्हणूनच नात्यात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता राखणं खूप महत्त्वाचं आहे.

दुसरा नियम
कधीकधी एखाद्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी असलेलं नातं इतकं वाढतं की त्यांच्यातील जवळीक आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. पण अशी जवळीक कधीकधी नात्यात दरी निर्माण करते. त्यामुळे अशी जवळीक टाळली पाहिजे. खासकरून पती-पत्नींच्या नात्यामध्ये पतीने अन्य परक्या स्त्रीसोबत किंवा पत्नीने अन्य परक्या पुरुषासोबत अतिजवळीक टाळणे आवश्यक आहे. कारण, अशा परिस्थितींमध्ये नात्यामध्ये एखादी ठिणगी पडून सर्व घर उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो.

तिसरा नियम
तुमच्या कठीण काळात जो तुमच्यासोबत उभा राहत नाही, अशा व्यक्तीकडून तुम्ही कोणत्याही अपेक्षा ठेवू नयेत. चाणक्य म्हणतात की, अशा लोकांपासून अंतर ठेवणं चांगलं. अशा लोकांना अनावश्यकपणे मदत करू नये.

चौथा नियम
चाणक्य म्हणतात की, कधीही आपल्या नात्याची तुलना दुसऱ्या कोणाशी करू नये. कारण बऱ्याचदा मत्सरही यातून निर्माण होतो. हीच गोष्ट हळूहळू नातं नष्ट करते. ही बाब सर्वच नात्यांना लागू पडते.

पाचवा नियम
जे तुमचं भलं करतात किंवा तुमच्यासाठी कोणतीही चांगली गोष्ट करतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. चाणक्य यांच्या मते, कृतज्ञता न दाखवणं ही मानवी चारित्र्याची कमजोरी आहे.

हेही वाचा - Chanakya Niti : एकटे राहण्याची भीती वाटते? सुचेनासं होतं? चाणक्यनीतीत सांगितलेत एकटे असण्याचे फायदे

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही.)


सम्बन्धित सामग्री