Bathing Mistake to Avoid: आंघोळ करणे हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग आहे, जो स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक आहे. शिवाय, आंघोळीचे इतरही अनेक फायदे आहेत. पण जर हेच तुमच्यासाठी घातक ठरले तर? इंटरनेटवर एमबीबीएस डॉक्टर रिचा तिवारी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टरांनी आंघोळीशी संबंधित अशीच एक धक्कादायक बाब सांगितली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया-
आंघोळ करताना ही चूक करू नका
डॉक्टर रिचा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की, काही काळापूर्वी एका 18 वर्षीय मुलीला बेशुद्ध अवस्थेत त्यांच्याकडे आणले गेले होते. मुलीची आई तिच्यासोबत होती. आईने सांगितले की, मुलगी बाथरूममध्ये आंघोळ करत होती. सुरुवातीला त्यांना वाटले की, आज रविवार आहे आणि म्हणूनच बराच वेळ ती केस धुण्यासाठी घेत आहे. मात्र, बराच वेळ होऊनही दार उघडले नाही, तेव्हा आईने दार तोडले. आत मुलगी जमिनीवर बेशुद्ध पडली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की, तिचे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब पूर्णपणे सामान्य होता. परंतु रक्तातील कार्बोक्सीहेमोग्लोबिनचे प्रमाण बरेच जास्त होते.
हेही वाचा - मुलीने गळ्यात अडकवला साप! आता हसू की रडू कळेना; लोक म्हणाले, भयंकर धाडस!
डॉ. रिचा म्हणतात, हे कार्बन मोनोऑक्साइड (CO) मुळे घडले. कार्बन मोनोऑक्साइड हा गंधहीन, रंगहीन आणि अत्यंत धोकादायक वायू आहे. बाथरूममधील गॅस गिझरमधून हा वायू बाहेर पडत होता आणि त्यामुळे बाथरूममध्ये ऑक्सिजनची कमतरता होती.
डॉक्टरांच्या मते, अनेकदा बंद बाथरूममध्ये गॅस गिझर सुरू असताने हा वायू हळूहळू भरतो आणि व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. बऱ्याचदा ते लक्षातही येत नाही आणि व्यक्ती बेशुद्ध पडते. वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू देखील होऊ शकतो.
आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवा
मोकळी हवा - डॉक्टर व्हिडिओमध्ये पुढे म्हणतात, जर तुमच्या बाथरूममध्ये गिझर असेल तर बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन किंवा खिडकी असावी जेणेकरून कोणताही हानिकारक वायू बाहेर पडू शकेल.
गिझरची जागा - बंद बाथरूममध्ये कधीही गिझर बसवू नका. बाथरूममध्ये गिझर आणि शॉवर एकत्र बसवू नका. बाथरूमच्या बाहेर गिझर बसवण्याचा प्रयत्न करा.
सेन्सर किंवा अलार्म - बाथरूमध्ये हवेसाठी सेन्सर किंवा अलार्म बसवा. बाथरूमध्ये हवेची शुद्धता मोजण्यासाठी सेन्सर किंवा अलार्म बसवा. बाजारात CO गॅस डिटेक्टर उपलब्ध आहेत, जे गॅसची पातळी वाढताच अलर्ट करतात.
आंघोळीचा वेळ मर्यादित ठेवा - याशिवाय, कोणताही धोका टाळण्यासाठी बंद बाथरूममध्ये जास्त वेळ आंघोळ करू नये, असा सल्ला डॉक्टर देतात.
डॉक्टर म्हणतात, गॅस गिझर हे एक महत्त्वाचे उपकरण असू शकते. परंतु, जर खबरदारी घेतली नाही तर ते प्राणघातक देखील ठरू शकते. दरवर्षी शेकडो लोक या निष्काळजीपणामुळे किंवा माहिती नसल्यामुळे आपला जीव गमावतात. म्हणून, आपण स्वतः जागरूक होणे आणि आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही त्याच्या धोक्यांबद्दल माहिती देणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा - VIDEO : वनअधिकाऱ्याने X वर शेअर केला हत्तींच्या पिल्लांचा सुंदर व्हिडिओ; लोकांकडून कौतुकाचा वर्षाव
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)