Rahul Dravid: आयपीएल 2026 च्या आधीच राजस्थान रॉयल्सची डोकेदुखी वाढली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. राजस्थान रॉयल्सने द्रविडला प्रशिक्षकापेक्षा मोठी जबाबदारी देण्याचा विचार केला होता, परंतु त्यांनी ती ऑफरही नाकारली.
आयपीएल 2025 मधील अपयश
द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. मात्र, आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचा प्रवास निराशाजनक ठरला आणि संघ पॉइंट टेबलमध्ये 9व्या स्थानावर राहिला. त्यानंतर फ्रँचायझीतील तणाव उघडकीस आल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - Axar Patel: अक्षर पटेलचे कर्णधारपद धोक्यात, दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वात होऊ शकतो मोठा फेरबदल
गटबाजी आणि कर्णधाराचा वाद
काही माध्यमांच्या वृत्तांनुसार, संघात तीव्र गटबाजी सुरू होती. भविष्यातील कर्णधार कोण व्हावा यावरून मतभेद झाले आहेत. एक गट सध्याचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यावर विश्वास ठेवत आहे. तर दुसरा गट तरुण रियान पराग याला पुढे आणू इच्छितो. तर तिसरा गट टीम इंडियाचा उदयोन्मुख स्टार यशस्वी जयस्वाल याला कर्णधार बनवण्याची मागणी करत आहे. या सततच्या अंतर्गत वादामुळे द्रविड कंटाळले आणि त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - Rahul Dravid: धक्कादायक निर्णय! राहुल द्रविडने IPL 2026 आधीच सोडली राजस्थान रॉयल्सची साथ
दरम्यान, संजू सॅमसन संघ सोडण्याचा विचार करत असल्याच्या बातम्याही चर्चेत आहेत. संघ व्यवस्थापन आता नव्या प्रशिक्षक आणि संभाव्य कर्णधाराच्या शोधात आहे. आयपीएल 2026 च्या अगोदरच झालेल्या या बदलामुळे राजस्थान रॉयल्सचे आव्हान आणखी कठीण होणार आहे.