Monday, September 01, 2025 01:41:35 AM

डेंग्यू प्रतिबंधक लस

भारताने डेंग्यू या आजारावर प्रतिबंधक लस विकसित केली आहे.

डेंग्यू प्रतिबंधक लस

मुंबई : डेंग्यू या आजारात रक्तातील प्लेटलेट कमी होतात. यामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका असतो. या आजारात रुग्णाला वाचवण्यासाठी तुळशीची पाने खाणे, पपई खाणे, पपईच्या पानांचा रस पिणे तसेच ताजी फळे खाणे हे घरगुती उपाय आहेत. पण रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास डॉक्टर प्लेटलेट चढवून उपचार सुरू करतात. या कारणामुळे अनेकांच्या मनात डेंग्यू या आजाराविषयी भीती आहे. आता ही भीती कमी होऊ शकते. कारण भारताने डेंग्यू या आजारावर प्रतिबंधक लस विकसित केली आहे. आयसीएमआरच्या मदतीने इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सेंटरने डेंग्यू या आजारावर प्रतिबंधक लस विकसित केली आहे. या लसची अंतिम ट्रायल सुरू आहे. ड्रग कंट्रोलर जनरल यांनी लसच्या अंतिम ट्रायलला मंजुरी दिली आहे. 


सम्बन्धित सामग्री