Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीमधील नात्याचा उत्सव आहे. रक्षाबंधनाचा सण प्रत्येक वर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या आयुष्यभर रक्षणासाठी प्रार्थना करतात. परंतु यंदाच्या रक्षाबंधनात एक वेगळा विशेष योग आहे. या दिवशी भद्राची सावली नसेल, मात्र राहुकालाचा एक तास मात्र टाळणे गरजेचे आहे.
हिंदू पंचांगानुसार भद्रा ही एक अशुभ वेळ मानली जाते आणि या वेळी कोणतेही शुभ कार्य टाळले जाते. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा नसल्यानं, बहिणी दिवसभर राखी बांधू शकतात. त्यामुळे वेळेची मर्यादा न राहता पूजेसाठी अनेक शुभ मुहूर्त उपलब्ध असतील.
हेही वाचा - Raksha Bandhan 2025: कोणती राखी घेऊ? संभ्रमात आहात? भावाच्या राशीनुसार लकी रंगाची राखी बांधा.. त्याचं भाग्य उजळेल!
राहुकाळात राखी बांधणे टाळा -
यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी 09:08 ते 10:47 या वेळेत राहुकाल असेल. राहुकालात राखी बांधणे टाळावे, कारण या काळात कोणतेही शुभ कार्य केल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. राहु ग्रहाची अशुभता पूजेच्या प्रभावावर परिणाम करू शकते. राहुकाळात राखी बांधल्याने भाऊ आणि बहिणीच्या नात्यात अनवधानाने तणाव येऊ शकतो.
हेही वाचा - Janmashtami 2025 Date: यंदा जन्माष्टमी 15 की 16 ऑगस्टला? जाणून घ्या नेमकी तारीख आणि शुभमुहूर्त
राखी बांधण्यासाठी शुभ वेळ कोणती?
यंदा भद्रा नसल्यामुळे सकाळी 06:00 पासून रात्री 09:00 वाजेपर्यंत राखी बांधता येईल. फक्त सकाळचा 09:08 ते 10:47 पर्यंतचा काळ वगळावा. रक्षाबंधन हा केवळ राखीचा सण नाही, तर प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचं प्रतीक आहे. योग्य मुहूर्त आणि विधीचे पालन केल्यास या सणाचा अध्यात्मिक लाभ अधिक होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)