Monday, September 01, 2025 12:35:03 AM

1 मार्चपासून बदलणार आर्थिक नियम! FD, LPG, UPI आणि कर नियोजनावर होणार थेट परिणाम

फेब्रुवारी संपत आला असून, 1 मार्च 2025  पासून अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होईल.

1 मार्चपासून बदलणार आर्थिक नियम fd lpg upi आणि कर नियोजनावर होणार थेट परिणाम

फेब्रुवारी संपत आला असून, 1 मार्च 2025  पासून अनेक महत्त्वाचे आर्थिक बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होईल. फिक्स्ड डिपॉझिट (FD), एलपीजी दर, म्युच्युअल फंड, डिमॅट खाते आणि UPI नियमांमध्ये बदल होणार असून, आयकर नियोजनासाठीही ही शेवटची संधी असेल.

1 मार्चपपासून होणारे प्रमुख बदल: 

1) FD व्याजदर बदलणार

जर तुम्ही बँकेत FD गुंतवणूक करत असाल, तर हा बदल तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मार्च 2025 पासून बँका त्यांच्या तरलतेनुसार व्याजदर ठरवू शकतील, त्यामुळे व्याजदर वाढू किंवा कमी होण्याची शक्यता आहे. अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांना याचा मोठा परिणाम जाणवेल.

2) LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल

दर महिन्याच्या १ तारखेला तेल कंपन्या नवीन LPG दर जाहीर करतात.1 मार्च रोजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ किंवा कपात होऊ शकते. सकाळी ६ वाजल्यापासून सुधारित दर लागू होतील.

हेही वाचा : टॉप 24 सुपर अब्जाधीशांच्या यादीत अंबानी-अदानीचा समावेश; कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? जाणून घ्या

3)  ATF आणि CNG- PNG दरांमध्ये बदल

एलपीजीसह एअर टर्बाइन फ्युएल (ATF), CNG आणि PNGच्या दरांमध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक आणि विमान प्रवासाच्या खर्चावर याचा परिणाम होऊ शकतो.

4) म्युच्युअल फंड आणि डिमॅट खाते नियम सुधारणा

SEBI ने म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. १ मार्चपासून नामांकन प्रक्रियेत सुधारणा होईल, जेणेकरून गुंतवणूकदारांच्या निधनानंतर मालमत्ता हस्तांतर सोपे होईल.

हेही वाचा : 77 वर्षीय आईला 5000 रुपये निर्वाह भत्ता देण्याविरुद्ध मुलाची याचिका; 'कलियुग!' म्हणत न्यायालयाने लावला 50 हजारांचा दंड!

5) आयकर नियोजनासाठी शेवटची संधी

मार्च महिना सुरू होताच करदाते टॅक्स बचतीसाठी गुंतवणुकीचे पर्याय शोधू लागतात. मार्च एंडिंगपूर्वी गुंतवणूक केल्यास कर वाचवण्याची संधी असेल, त्यामुळे वेळेवर नियोजन करणे गरजेचे आहे.

6) UPI पेमेंटमध्ये नवीन नियम लागू

IRDAI ने युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) मँडेट अंतर्गत विमा पॉलिसी प्रीमियम ब्लॉक करण्याची सुविधा लागू केली आहे. आता विमा पॉलिसी जारी झाल्यानंतरच पैसे विमा कंपनीकडे ट्रान्सफर होतील, त्यामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षितता मिळेल.

या बदलांचा तुमच्यावर कसा परिणाम होईल?
    •    गुंतवणूकदारांनी FD आणि म्युच्युअल फंडांचे नियोजन त्वरित करावे.
    •    LPG, CNG, PNG च्या नवीन किमतींवर लक्ष ठेवा.
    •    डिमॅट आणि म्युच्युअल फंड खात्यांसाठी नामांकन प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
    •    करदात्यांनी मार्च संपण्याआधी टॅक्स वाचवण्यासाठी योग्य गुंतवणुकीचे पर्याय निवडावेत.


सम्बन्धित सामग्री