Sunday, August 31, 2025 09:16:19 PM

लाडक्या बहिणींसाठी सरसावल्या सुप्रिया सुळे

लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीपासूनच २१०० रूपये मासिक रक्कम द्यायला सुरूवात करा'. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

लाडक्या बहिणींसाठी सरसावल्या सुप्रिया सुळे

महाराष्ट्र: यंदाची सर्वात लाडकी योजना ठरली ती  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'. यंदाच्या निवडणुकीत देखील महायुती सरकारसाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली.  याच लाडक्या बहिणींसाठी आता शरद पवार  गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे सरसावल्या आहेत. 'लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यात २१०० रूपये द्या, हा डिसेंबर महिना संपत आला आहेच. लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीपासूनच २१०० रूपये मासिक रक्कम द्यायला सुरूवात करा'. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे महायुती सरकारच्या योजनेबद्दल भाष्य केलं. 'लाडक्या बहिणींना १ जानेवारीपासून २१०० देण्यात यावेत. आता नवीन वर्ष सुरू होईल. डिसेंबर महिना काही दिवसांमध्ये संपेल. शक्य असेल तर, डिसेंबर किंवा १ जानेवारीपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यात २१०० मासिक रक्कम जमा करा. आम्ही तर म्हणतो ३ हजार रूपये द्या. कारण आम्ही सत्तेवर आलो असतो, तर महिन्याला ३ हजार रूपये देणार होतो.' असे शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 

योजनेविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? 

'ही योजना सुरूच राहणार आहे. या योजनेचा विस्तार होईल. अर्थ संकल्पाच्या नियोजनादरम्यान तपशीलांवर चर्चा केली जाईल. राज्याच्या आर्थिक स्त्रोतांचे मूल्यांकन केल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. पात्र महिलांना २१०० रूपये देऊ.' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीपासूनच २१०० रूपये मासिक रक्कम द्यायला सुरूवात करा'. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


सम्बन्धित सामग्री