Gold Rate Today: आज 4 ऑगस्ट 2025 रोजी देशभरातील सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदवण्यात आली आहे. विशेषतः मुंबईसह देशाच्या प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर कमी झाल्याचं दिसत आहे. आरबीआयच्या मौद्रिक धोरण समितीची (Monetary Policy Committee) बैठक आजपासून सुरू झाली असून 6 ऑगस्ट रोजी अंतिम निर्णयाची घोषणा केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात चलनवाढ आणि व्याजदरांबाबतच्या अंदाजामुळे मौल्यवान धातूंच्या दरात हालचाल झाली आहे.
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम ₹1,01,340 इतका आहे, तर २२ कॅरेट सोनं ₹92,890 प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. विशेष म्हणजे चांदीच्या दरातही घट झाली असून, आज प्रति किलो चांदी ₹1,12,900 या दराने मिळत आहे
दिल्ली, अहमदाबाद, पटना व इतर शहरांतील दरराष्ट्रीय राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,01,490 प्रति 10 ग्रॅम आहे आणि 22 कॅरेट सोनं ₹93,040 दराने उपलब्ध आहे. अहमदाबाद आणि पटना शहरांमध्ये २४ कॅरेट सोनं ₹1,01,390 प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. या शहरांमध्ये 22 कॅरेट सोनं ₹92,940 इतकं आहे.
हेही वाचा: ITR नाही भरला तर काय होणार? 'या' 5 परिणामांचा भविष्यात होऊ शकतो पश्चात्ताप
देशाच्या आर्थिक राजधानीसह अन्य मेट्रो शहरांतील दर
मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरु आणि कोलकाता या प्रमुख महानगरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,01,340 प्रति 10 ग्रॅम इतका असून, 22 कॅरेट सोनं ₹92,890 दराने उपलब्ध आहे.
सोन्याचे दर कसे ठरतात?
सोनं आणि चांदीचे दर अनेक जागतिक आणि स्थानिक घटकांवर आधारित असतात. डॉलर-रुपया विनिमय दर, आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्या-चांदीचे भाव, सीमा शुल्क, स्थानिक कर आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतार याचा थेट परिणाम ह्या धातूंवर होतो. भारतात सोने हे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं मानलं जातं. सण-उत्सव, लग्नसराई, व्रतवैकल्य यामध्ये सोनं खरेदी करण्याची परंपरा असल्यामुळे मागणी कायम राहते.
सदर दर हे कर (GST) व मेकिंग चार्जशिवाय आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारात किंमतीत थोडाफार फरक दिसून येऊ शकतो.
सोन्याच्या दरात घसरण झालेली असतानाच येत्या काळात आरबीआयच्या धोरण निर्णयाकडे बाजाराचं लक्ष लागलं आहे. व्याजदरांमध्ये होणाऱ्या बदलानंतर सोन्या-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी स्थानिक जौहरीकडून नक्की माहिती घेऊनच खरेदी करावी.