No Tariff On Gold : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोन्यावर शुल्क न लावण्याबद्दल घोषणा करताच सोन्याचे दर खाली उतरू लागले. यामुळे अचानक घरगुती बाजारापासून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने स्वस्त झाले. सोमवारी, MCX वर सोन्याचा वायदा भाव एकदम 1400 रुपयांनी कोसळला. यानंतर मंगळवारीही सोन्याचे भाव उतरल्याचे पहायला मिळाले. यानंतर बंधवारी दर पुन्हा वाढले. मात्र, तरीही सोन्यावर ट्रम्प टॅरिपची वक्रदृष्टी पडणार नाही, यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.
ट्रम्प सोन्यावर शुल्क लावतील काय, अशी धास्ती सर्वांच्या मनात होती. मात्र, ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोशल मीडिया अकाऊंटवरून सर्व अटकळी चुकीच्या ठरवत सोन्यावर टेरिफ लावणार नसल्याची घोषणा (No Tariff On Gold) केली. यानंतर सर्वांना हायसे वाटले. ही भारतीय सोने खरेदीदारांसाठी सणासुदीच्या काळात चांगली बातमी आहे, तज्ज्ञ म्हणत आहेत.
हेही वाचा - अमेरिका-चीन संघर्ष... पंतप्रधान मोदींचा आजच्या बैठकीत हा निर्णय, चिप मार्केटबाबत एक मोठे पाऊल!
तज्ज्ञ म्हणाले- हे भारतासाठी चांगले आहे
ट्रम्प यांच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 2.48% घसरून 3,404.70 डॉलर प्रति औंसपर्यंत आले होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव (MCX Gold Price) सोमवारी 1409 रुपयांनी कमी होऊन 1,00,389 रुपयांवर आला. तर, मंगळवारी आणखी थोडा कमी झाला. ट्रम्प यांच्या सोन्यावर शुल्क न लावण्याबद्दल घेतलेल्या या निर्णयाचा भारतीय बाजारावर सकारात्मक परिणाम होईल, असे तज्ज्ञ म्हणत आहेत. तसेच, पुतीन आणि ट्रम्प यांच्यात सोन्याच्या आणि शांततेच्या चर्चेचाही सोन्याच्या दरावर परिणाम होऊ शकते.
दरम्यान, या सण-उत्सवांच्या हंगामात सोन्याची खरेदी करण्याचे ठरवत असलेल्या सोन्याच्या भारतीय खरेदीदारांसाठी ही चांगली संधी आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांचा हा निर्णय सोन्याच्या किंमतींसाठी नकारात्मक असल्याचे सिद्ध होऊ शकते आणि भारतीय खरेदीदार स्वस्त सोनं मिळवू शकतात.
आज सोन्याच्या किमतीत हलकी वाढ दिसून येत आहे. आज MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याच्या ऑक्टोबर महिन्याच्या वायद्याची किंमत 55 रुपयांनी वाढून 1,00,200 रुपये झाली आहे. यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 92,900 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 1,01,350 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र सराफा बाजारात थोडीफार घट दिसून येत आहे, जिथे सोन्याचा भाव 50 रुपयांनी कमी झाल्याची नोंद आहे.
भारत हा सोन्याचा एक प्रमुख आयातदार देश आहे आणि जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. घरगुती मागणी पूर्ण करण्यासाठी भारत सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात (Gold Import) करतो.
हेही वाचा - Trump Tariff: भारताच्या कापड निर्यातीवर ट्रम्प टॅरिफचे सावट; उत्पादन इतर देशांत हलवले जाऊ शकते