Friday, September 05, 2025 10:08:12 PM

Gold-Silver Price Today : सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ; 'या' कारणामुळे वाढली ग्राहकांमध्ये मागणी

कालच्या व्यवहारात सोन्यात 1 टक्क्यांनी घट झाली होती. त्याच वेळी, आजच्या जोरदार मागणीमुळे आणि जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे सोन्याची चमक वाढली आहे.

gold-silver price today  सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ या कारणामुळे वाढली ग्राहकांमध्ये मागणी

Gold Silver Price Today: आज म्हणजेच शुक्रवारी देशांतर्गत कमोडिटी बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या. त्याआधी गुरुवारी मोठी घसरण झाली. कालच्या व्यवहारात सोन्यात 1 टक्क्यांनी घट झाली होती. त्याच वेळी, आजच्या जोरदार मागणीमुळे आणि जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे सोन्याची चमक वाढली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 3 ऑक्टोबर रोजी करार संपलेले सोने 0.24 टक्के वाढून 1,06,670 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते. दुसरीकडे, डिसेंबर करार संपलेल्या चांदीचा भाव 0.47 टक्के वाढून 1,24,500 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.

डॉलर कमकुवत, फेड दर कपातीची अपेक्षा

अमेरिकन डॉलरमधील 0.30 टक्के घसरण आणि यूएस फेड रिझर्व्हकडून या महिन्यात 25 बेसिस पॉइंट व्याजदर कपातीची शक्यता ही सोन्याच्या किंमती वाढण्यामागील मोठी कारणे ठरत आहेत. अमेरिकेतील रोजगार बाजार कमकुवत झाल्यानेही सोन्याला आधार मिळाला आहे.

सणासुदीचा आणि लग्नसराई हंगामाचा प्रभाव

भारतामध्ये लवकरच सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराईचा काळ सुरू होणार आहे. या कालावधीत सोन्याची खरेदी वाढते, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होतो. यासोबतच ट्रम्प टॅरिफवरील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत.

हेही वाचा - GST 2.0: 453 पैकी फक्त 40 वस्तूंवरील करदरात वाढ; 2026-27 मध्ये सरकारला 3700 हजार कोटींचे नुकसान होणार

सोने आणि चांदीचा सराफा बाजारातील ताजा दर - 

24 कॅरेट सोने (999): 1,05,950 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट सोने: 1,03,400 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी: 1,23,207 रुपये प्रति किलो

हेही वाचा - GST : सेसच्या 'या' प्रकारांमुळे मिळाली GST वर मोठी सूट, जाणून घ्या

चांदीची मागणीही वाढली

याशिवाय, देशात सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. या काळात सोने आणि चांदीची खरेदी वाढते. चांदीबद्दल बोलायचे झाले तर, इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनेल आणि इतर उद्योगांमध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, ज्यामुळे त्याच्या किमती सतत वाढत आहेत.


सम्बन्धित सामग्री