Wednesday, August 20, 2025 07:36:55 AM

Gold-Silver Price Today: सोन्याच्या भावात मोठी उसळी; चांदीतही चढ-उतार, जाणून घ्या आजचे ताजे दर

सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; 24 कॅरेट 10 ग्रॅम 1,01,140 रुपये तर 22 कॅरेट 92,712 रुपये. चांदीच्या किंमतीतही बदल. हॉलमार्क सोने खरेदीचा सल्ला, दर आणखी वाढण्याची शक्यता.

gold-silver price today सोन्याच्या भावात मोठी उसळी चांदीतही चढ-उतार जाणून घ्या आजचे ताजे दर

Gold-Silver Price Today: सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचवत आहेत. काही दिवसांपूर्वी थोडी घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींनी उसळी घेतली आहे. 11 ऑगस्ट 2025, सोमवारी सकाळपासून देशभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, चांदीच्या किंमतींमध्येही बदल नोंदवला गेला आहे. या वाढीमुळे सण-समारंभ किंवा लग्नसराईच्या तयारीत असलेल्या ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आजचे दर (11 ऑगस्ट 2025)
बुलियन मार्केटनुसार, आज 24  कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,01,140 रुपये इतका आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 92,712 रुपये आहे. चांदीबाबत बोलायचे झाल्यास, 1 किलो चांदीचा दर 1,14,530 रुपये तर 10 ग्रॅमसाठी 1,145 रुपये आहे.

प्रमुख शहरांतील दर
मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक या चारही ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 92,547 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,00,960 रुपये इतका नोंदवला गेला आहे.

22 कॅरेट आणि 24 कॅरेटमधला फरक
सोनं खरेदी करताना कॅरेटचा फरक समजून घेणं अत्यावश्यक आहे. 24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध असतं, परंतु ते मऊ असल्याने त्याचे दागिने बनविणे शक्य नसते. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी 22 कॅरेट सोने जास्त प्रमाणात उपलब्ध असते, ज्यामध्ये अंदाजे 91% सोने आणि उर्वरित 9% तांबे, चांदी, जस्त यांसारख्या इतर धातूंचे मिश्रण असते. या मिश्रणामुळे दागिने मजबूत आणि टिकाऊ होतात.

दर बदलण्यामागची कारणे
सोन्या-चांदीच्या दरात होणारे चढ-उतार अनेक घटकांवर अवलंबून असतात आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती, डॉलर-रुपया विनिमय दर, मध्यवर्ती बँकांची खरेदी, गुंतवणूकदारांचा कल आणि स्थानिक मागणी-पुरवठा परिस्थिती. अलीकडील भू-राजकीय परिस्थिती आणि महागाई दरामुळेही दरांवर परिणाम झाला आहे.

ग्राहकांसाठी सल्ला
सध्या दर वाढीच्या पार्श्वभूमीवर खरेदीपूर्वी विविध शहरांतील आणि ज्वेलर्सकडील दरांची तुलना करणे फायदेशीर ठरेल. तसेच, हॉलमार्क असलेलेच दागिने खरेदी करावेत, जेणेकरून शुद्धतेची खात्री मिळेल.

सण-उत्सवाच्या काळात सोन्याच्या मागणीत होणारी वाढ आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेता, पुढील काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवतात. त्यामुळे सोनं खरेदीचा विचार करणाऱ्यांनी योग्य वेळ साधून व्यवहार करावा.


सम्बन्धित सामग्री