Wednesday, August 20, 2025 09:23:20 AM

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी जमा होणार पैसे

लाडक्या बहिणींचे दोन दिवसात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या दिवशी जमा होणार पैसे

महाराष्ट्र: निवडणूका झाल्या, निकाल लागला, शपथविधी सोहळा देखील मोठ्या दिमाखात संपन्न झाला. आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती त्याच्या खात्यात पैसे जमा होण्याची. महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता पुन्हा आली तर या 1500 हजारांचे 2100 रुपये केले जातील असे आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. आता राज्यात महायुतीचं सहकार बहुमताने स्थापन झालं आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणी  पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. त्यातच आता काही लाडक्या बहिणींचे अफर्ज बाद होण्याची देखील शक्यता आहे. परंतु लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देखील समोर आली आहे. लाडक्या बहिणींचे दोन दिवसात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. 

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ? 

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणीचे पैसे म्हणजेच 1500 रुपये येत्या दोन दिवसात खात्यात जमा होणार असलीच सांगितलं. यामुळे सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान यातच आता विशेष बाब म्हणजे काही लाडक्या बहिणींचे अर्ज बाद  होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान लाडक्या बहिणींचे अर्ज का बाद  होतील जाणून घेऊयात. 

का होऊ शकतात लाडक्या बहिणींचे अर्ज बाद?

१) लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे. ज्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढू शकतं. कारण आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची फेरपडताळणी होणार असल्याची माहिती आहे. ज्यामध्ये अनेक महिलांचे अर्ज हे बाद होऊ शकतात.

२) ज्या महिलांचे अर्ज बाद होतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण आता निकषा बाहेर बसणाऱ्या महिलांचा अर्ज हा बाद  केला जाईल. 

३) अर्ज बाद  केल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आलं आहे.

४) ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ यापुढे मिळणार नाही.

५) ज्या महिला किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील. तसंच मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्य करत असतील. तसंच सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

६) लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहे.तसंच ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

दरम्यान आता येत्या दोन दिवसात लाडक्या बहिणींचे पैसे जमा होणार असल्याची शक्यता असल्याने लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


सम्बन्धित सामग्री