Thursday, August 21, 2025 02:07:20 AM

Grahan Yog 2025: ‘या’ 5 राशींवर संकट; 15 ते 17 जुलै दरम्यान ग्रहण व विष योगाचा विनाशकारी परिणाम? वाचा संपूर्ण माहिती

15 ते 17 जुलैदरम्यान ग्रहण व विष योगाचा प्रभाव जाणवणार. कर्क, सिंह, कन्या, कुंभ व मीन राशींना त्रास संभवतो. मानसिक, आर्थिक व कौटुंबिक अडचणी संभवतात. उपाय जाणून घ्या.

grahan yog 2025 ‘या’ 5 राशींवर संकट 15 ते 17 जुलै दरम्यान ग्रहण व विष योगाचा विनाशकारी परिणाम वाचा संपूर्ण माहिती

Grahan Yog 2025: 2025 च्या जुलै महिन्यात आकाशात असा एक योग जुळून आला आहे, ज्यामुळे काही राशींवर संकटांची मालिका ओढवू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, 13 जुलैपासून सुरू होणाऱ्या ग्रहांच्या हालचालीमुळे चंद्र आणि राहूच्या युतीने ग्रहण योग तयार होतोय, तर चंद्र आणि शनीच्या युतीने विष योग तयार होत आहे. या दोन्ही योगांचा प्रभाव 17 जुलैपर्यंत राहणार असून त्याचा परिणाम काही खास राशींवर अधिक तीव्रतेने जाणवेल.

हे दोन्ही योग अत्यंत अशुभ मानले जात असून, मानसिक, आर्थिक, शारीरिक आणि कौटुंबिक जीवनावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. या काळात सावधगिरी आणि योग्य उपाय यांची गरज भासेल.

हेही वाचा: Weekly Horoscope july 13 to july 19: ग्रहांची चाल बदलणार नशिबाची दिशा? जाणून घ्या तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

या राशींना राहावे लागेल अधिक सतर्क: 

1. कर्क रास: कामात अडथळे, चिडचिड वाढू शकते
कर्क राशीतील लोकांना ग्रहण योगाचा विशेष फटका बसू शकतो. त्यांच्या कामात सतत अडथळे येण्याची शक्यता आहे. सरकारी कामांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. विरोधक सक्रिय होतील आणि तुमच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न करतील.
उपाय: रोज चंद्राला पाणी अर्पण करा आणि गरजूंना तांदूळ दान करा.

2. सिंह रास: नात्यांमध्ये तणाव, पार्टनरशी वाद
सिंह राशीच्या जातकांना वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये तणाव जाणवेल. जीवनसाथी किंवा व्यावसायिक भागीदारासोबत मतभेद, वाद यांचा सामना करावा लागू शकतो.
उपाय: शिवलिंगावर दुध-गंगाजल अर्पण करा आणि संयमी वाणी वापरा.

3. कन्या रास: आर्थिक आणि वैवाहिक समस्यांचा संभव
कन्या राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष काळजी घ्यावी. नवीन व्यवसाय किंवा गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. जोडीदाराशी मतभेद उद्भवू शकतात.
उपाय: 'ॐ श्रं श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः' मंत्राचा नियमित जप करा.

4. कुंभ रास: मानसिक दबाव, आत्मविश्वासात घट
या राशीमध्येच ग्रहण योग तयार होत असल्यामुळे कुंभ राशीतील लोकांना आत्मविश्वासात कमतरता जाणवू शकते. विरोधक अपप्रचार करु शकतात. पैशांच्या व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे.
उपाय: दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करा.

5. मीन रास: आरोग्य बिघडण्याची शक्यता, मतभेद वाढू शकतात
या राशीच्या लोकांनी आरोग्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. आरोग्य बिघडल्यास हॉस्पिटलपर्यंत जाण्याची वेळ येऊ शकते. कुटुंबात वडिलधाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
उपाय: रोज शिव चालिसाचे पठण करा.

15 ते 17 जुलैदरम्यान तयार होणारे ग्रहण योग आणि विष योग काही राशींना चांगले धडे शिकवू शकतात. या काळात मानसिक शांतता, संयम आणि सकारात्मक ऊर्जा टिकवणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही मोठ्या निर्णयास थोडा वेळ थांबा द्या आणि शक्य तितके धार्मिक उपाय अवलंबा.

(DISCLAIMER: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)
 


सम्बन्धित सामग्री