मुंबई : मुंबईत बरसणाऱ्या पावसासंदर्भात मुंबई महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई शहर व उपनगरात आज, बुधवारी काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसासह अधूनमधून 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं दिली आहे. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसानं आज मुंबईत थोडीशी उसंत घेतली आहे. कोसळधारनंतर आज रिमझिम स्वरुवाचा पाऊस पडत आहे. पश्चिम रेल्वे सेवा 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत असून शाळा-कॉलेज आज सुरू ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, हवामान खात्यांनं भरती आणि ओहोटीचे वेळापत्रक जारी केले असून नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : BEST Election Results : मनसेसोबत युती, ठाकरेंनी गमावली 9 वर्षांची सत्ता; महापालिका निवडणुकीसाठीच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित
समुद्रातील भरती आणि ओहोटीच्या वेळा याप्रमाणे -
भरती - सकाळी 10.14 वाजता - 4.02 मीटर
ओहोटी - सायंकाळी 4.18 वाजता - 1.91 मीटर
भरती - रात्री 10.03 वाजता - 3.44 मीटर
ओहोटी - मध्यरात्रीनंतर 4.11 वाजता (उद्या, 21 ऑगस्ट 2025) 0.83 मीटर