Wednesday, August 20, 2025 02:27:53 PM

या 125 गावांमध्ये होळीनिमित्त रंग खेळायला बंदी; इथली देवता रोमँटिक गाण्यांनीही होते नाराज!

उत्तराखंडमधील 125 गावांमध्ये खूपच वेगळ्या प्रकारच्या प्रथा-परंपरा आहेत. येथे चक्क होळी खेळण्यास मनाई आहे. या गावातील लोक रंगांना स्पर्श करण्यासही घाबरतात.

या 125 गावांमध्ये होळीनिमित्त रंग खेळायला बंदी इथली देवता रोमँटिक गाण्यांनीही होते नाराज

Holi Is Not Allowed : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात विविध जाती-धर्मांचे लोक राहतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा ते पाळतात. देशामध्ये 3,700 मीटर उंचीवर असलेल्या टेकडीवर वसलेल्या छिपला केदार या देवतेच्या भक्तांना देवतेच्या पूजा आणि यात्रेदरम्यान रंगीबेरंगी कपडे घालण्याची परवानगी नाही. फक्त पांढरे कपडे घालूनच पूजा करावी लागते.

उत्तराखंडमधील 125 गावांमध्ये खूपच वेगळ्या प्रकारच्या प्रथा-परंपरा आहेत. येथे चक्क होळी खेळण्यास मनाई आहे. या गावातील लोक रंगांना स्पर्श करण्यासही घाबरतात. होळी न साजरी करण्यामागे या लोकांनी दिलेले कारण खूपच चमत्कारिक आहे. लोक म्हणतात की होळी खेळल्याने त्यांच्या गावात नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. इतकेच नाही तर, काही गावांमध्ये लोक पूजा करताना रंगीबेरंगी कपडे घालण्यासही घाबरतात.

हेही वाचा - 'हे' आहेत शाही लोकांची शान असलेले जगातले सर्वात सुंदर आणि ऐटबाज घोडे! या खास प्रजाती तुम्हाला माहिती आहेत का?

देशभरात होळीचा उत्साह पसरत असताना, देशाच्या इतर भागांप्रमाणे उत्तराखंडच्या कुमाऊँ प्रदेशातील बहुतेक भागात होळी खेळली जात नाही. उत्तरेकडील या डोंगराळ प्रदेशातील 125 हून अधिक गावांमध्ये, लोक त्यांच्या पूर्वजांच्या देवतांच्या क्रोधामुळे रंगांच्या या सणापासून दूर राहणे पसंत करत आहेत. पिथौरागड जिल्ह्यातील तल्ला दर्मा, तल्ला जोहर परिसर आणि बागेश्वर जिल्ह्यातील मल्ला दानपूर परिसरातील 125 हून अधिक गावांमध्ये लोक होळीचा सण साजरा करत नाहीत. मुनस्यारी परिसरातील रहिवासी पुराणिक पांडे म्हणाले की, त्यांचे कुलदेवता रंगांनी खेळल्यामुळे रागावते, असे त्यांचे मत आहे.

या कारणाने होळी साजरी केली जात नाही

होळीचा सण हा एक पारंपारिक हिंदू सण आहे. हा सण माघ महिन्याच्या पहिल्या रविवारी सुरू होतो आणि चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेपर्यंत चालतो. या सणाविषयी देशभरात वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही ठिकाणी होळीच्या दिवशी रंग खेळले जातात तर, काही ठिकाणी धुलिवंदन दिवशी.. तर काही ठिकाणी पंचमी तिथीला येणाऱ्या रंगपंचमीदिवशी. हा हिंदू पारंपारिक सण 14 व्या शतकात चंपावतच्या चंद राजाने कुमाऊँ प्रदेशात आणला होता. राजांनी ब्राह्मण पुरोहितांद्वारे त्याची सुरुवात केली आणि त्यामुळे हा सण त्या पुरोहितांचा प्रभाव असलेल्या सर्व ठिकाणी पसरला. पूर्व कुमाऊँ प्रदेशाचे सांस्कृतिक इतिहासकार पदम दत्त पंत यांनी म्हटले आहे की, ज्या भागात पारंपारिक परंपरा पोहोचल्या नाहीत अशा ठिकाणी होळी साजरी केली जात नाही.

150 वर्षांपासून होळीवर बंदी आहे

समा विभागातील बऱ्याचशा गावांमध्ये अशी श्रद्धा आहे की, जर गावकरी रंगांनी खेळले तर कुलदेवता त्यांच्यावर रागावतात आणि नैसर्गिक आपत्तींची मालिका सुरू होते. केवळ कुमाऊँ प्रदेशातच नाही तर, गढवाल जिल्ह्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तीन गावे, क्विली, खुरझांग आणि आणखी एका गावात, कुलदेवी त्रिपुर सुंदरीची पूजा करणाऱ्या ग्रामस्थांचा असा समज आहे की, 150 वर्षांपूर्वी गावात देवीने नैसर्गिक आपत्तींची मालिका सुरू केली. या कारणाने गेल्या 150 वर्षांत या गावात कधीही होळी खेळली गेली नाही.

हेही वाचा - Chanakya Niti : 'हे' लोक सापापेक्षा हजार पटींनी वाईट, आयुष्यात दुर्दैवच घेऊन येतात..! तुमच्याही सहवासात असे कोणी आहे का?

गुजरात आणि झारखंडच्या या भागातही बंदी आहे

केवळ उत्तराखंडमध्येच नाही तर गुजरातच्या बनासकांठा प्रदेश आणि झारखंडच्या दुर्गापूर प्रदेशातील अनेक आदिवासी गावांमध्ये कुलदेवतांच्या शाप आणि क्रोधामुळे होळी खेळली जात नाही. छिपला केदार देवतेवर श्रद्धा असलेल्या अनेक गावांमध्ये होळी खेळली जात नाही. छिपला केदार देवता केवळ होळीच्या रंगांनीच नव्हे तर, होळीच्या रोमँटिक गाण्यांनीही नाराज होतात, असे इथल्या लोकांचे म्हणणे आहे.

फक्त पांढरे कपडे घालतात

3,700 मीटर उंचीवर असलेल्या टेकडीवर असलेल्या छिपला केदार देवतेच्या भक्तांना देवतेच्या पूजा आणि यात्रेदरम्यान रंगीबेरंगी कपडे घालण्याची परवानगी नाही. पुजाऱ्यांसह सर्व भाविक पूजेदरम्यान फक्त पांढरे कपडे घालतात. कुलदेवतांच्या क्रोधामुळे या प्रदेशात होळीवर अजूनही बंदी आहे, परंतु, दिवाळी आणि दसरा यासारखे पारंपारिक हिंदू सण आता या दुर्गम भागात आपले स्थान निर्माण करत आहेत. एका पुजाऱ्याने सांगितले की, या गावांमध्ये रामलीला सुरू झाली आहे आणि आता दिवाळी देखील साजरी केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री