Sunday, August 31, 2025 04:13:43 PM

दुबईमधून किती सोने आणण्यास आहे परवानगी? महिला आणि पुरुषांसाठी काय आहेत नियम; जाणून घ्या

भारताच्या तुलनेत दुबईमध्ये सोने खूपच स्वस्त मिळते, जिथे 1 ग्रॅम सोन्याची किंमत 8700 रुपये आहे. तर दुबईमध्ये 1 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 7900 रुपये आहे.

दुबईमधून किती सोने आणण्यास आहे परवानगी महिला आणि पुरुषांसाठी काय आहेत नियम जाणून घ्या
How Much Gold is Allowed to be Brought from Dubai
Edited Image

How Much Gold is Allowed to be Brought from Dubai: अनेकांना सोनं खरेदी करण्याची खूपचं हौस असते. लग्न असो किंवा कोणताही सण, भारतातील लोक अशा प्रसंगी सोने खरेदी करतात. याशिवाय, सोने हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय मानला जातो. सोन्याची किंमत वाढत राहिल्याने बरेच लोक त्यांचे पैसे गुंतवण्यासाठी सोने खरेदी करतात. भारतात सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत आहे. सध्या भारतात 1 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 8700 रुपये आहे. सोन्याच्या किंमती दररोज बदलत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.  

दुबईमध्ये मिळते स्वस्तात सोने - 

भारताच्या तुलनेत दुबईमध्ये सोने खूपच स्वस्त मिळते, जिथे 1 ग्रॅम सोन्याची किंमत 8700 रुपये आहे. तर दुबईमध्ये 1 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 7900 रुपये आहे. एवढेच नाही तर दुबईमध्ये सोन्यावरील मेकिंग चार्ज देखील भारतापेक्षा कमी आहे. दुबईतील सोने भारतीय सोन्यापेक्षा सुमारे 18 ते 20 टक्के स्वस्त आहे. पर्यटनासाठी गेलेले अनेक जण दुबईमध्ये गेल्यानंतर सोनं खरेदी केल्याशिवाय राहत नाहीत. तसेच काही लोक दुबईहूनही सोन्याची तस्करी करतात.

हेही वाचा - सोन्याच्या तस्करीत कन्नड अभिनेत्री अडकल्याने खळबळ! 14.8 किलो सोन्यासह विमानतळावर अटक

भारतात दुबईहून किती सोने आणू शकतो? 

दुबईहून सोने खरेदी करून ते भारतात आणण्यासाठी काही नियम आहेत. पुरुष दुबईहून फक्त 20 ग्रॅम सोने खरेदी करून भारतात आणू शकतात. तसेच महिला दुबईहून 40 ग्रॅम सोने खरेदी करून भारतात आणू शकतात. याशिवाय, जर तुम्ही दुबईमध्ये 6 महिने राहिल्यानंतर भारतात परतत असाल तर तुम्ही 1 किलो सोने कस्टम ड्युटी फ्री आणू शकता. तथापि, तुम्ही हे सोने नाणी किंवा बिस्किटांच्या स्वरूपात आणू शकत नाही. तुम्हाला हे दागिन्यांच्या स्वरूपात आणावे लागेल.

हेही वाचा - WHERE TO INVEST: ''या'' ठिकाणी पैसे गुंतवल्यास तुमचे पैसे होतील द्विगुणीत. जाणून घ्या

कन्नड अभिनेत्री रान्या रावने केली सोन्याची तस्करी - 

दोन दिवसांपूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) विमानतळावर कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला सोन्याची तस्करी करताना पकडले. बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रान्या रावला 14.2 किलो सोन्यासह पकडण्यात आले होते. गेल्या 15 दिवसांत रान्या 4 वेळा दुबईला गेली होती. एजन्सींना त्याच्यावर आधीच संशय होता. तथापि, आज अभिनेत्रीने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. 


सम्बन्धित सामग्री