Wednesday, August 20, 2025 01:05:12 PM

पाऊस आणि चहा.. आहाहा! पण कधीकधी चहा तितका चविष्ट नसतो.. का बरं? हे कारण असू शकतं

कधीकधी असं घडतं की, तुम्हाला चहा प्यायला आवडतो, पण चव तितकी खास नसते, जितकी ती असायला हवी होती. काहीतरी चुकल्यासारखे वाटते. असं का बरं होत असेल? चला, जाणून घेऊ..

पाऊस आणि चहा आहाहा पण कधीकधी चहा तितका चविष्ट नसतो का बरं हे कारण असू शकतं

How To Enhance Taste of the Tea : पावसाळा आणि चहाचं कॉम्बिनेशन अप्रतिम असतं.. पाऊस पडतोय आणि चहा प्यावासा वाटला नाही, असं घडत नाही. पण कधीकधी असं घडतं की, तुम्हाला चहा प्यायला आवडतो, पण चव तितकी खास नसते, जितकी ती असायला हवी होती. काहीतरी चुकल्यासारखे वाटते. जर तुमच्यासोबतही असे होत असेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. चला जाणून घेऊया ती कारणे कोणती आहेत..

दुधाची गुणवत्ता
पावसाळ्यात जास्त ओलावा असतो. ज्यामुळे दूध लवकर खराब होऊ लागते. कधीकधी व्यवस्थित दिसणारे दूध देखील उकळल्यावर त्याची चव खराब होते.

पाण्याची गुणवत्ता
पावसाळ्यात अनेक वेळा माती पाण्यात मिळसलेली असते, ज्यामुळे चहाची चव बदलते. जर तुम्ही फिल्टर केलेले पाणी वापरत नसाल तर, चहाची चव चांगली राहणार नाही.

चहाची पाने खराब झाली असू शकतात
पावसाळ्यात हवेतील ओलाव्यामुळे चहाची पाने ओलसर होऊ शकतात, ज्यामुळे त्याची चव आणि सुगंध दोन्ही कमी होतात. जर चहाला पूर्वीसारखा वास येत नसेल, तर त्यामागे चहाची पाने खराब झाल्याचे कारण असू शकते.

हेही वाचा - Pine Nuts Benefits: पाईन नटस् आहेत अत्यंत पौष्टिक; नेहमी खाण्याने मिळतील जबरदस्त फायदे

घटकांचे चुकीचे प्रमाण
पावसाळ्यात चहामध्ये आले, वेलची किंवा तुळस असे मसाले घालणे सामान्य आहे. परंतु, जर ते योग्य प्रमाणात घातले नसतील तर, चहाची चव बिघडू शकते.
याशिवाय आजूबाजूचा वास किंवा वातावरण देखील चहाच्या चवीवर परिणाम करते.

फक्कड चहा कसा बनवायचा?
नेहमी ताजे दूध आणि पाणी वापरा. चहाची पाने हवाबंद डब्यात ठेवा जेणेकरून ती ओलसर होणार नाहीत. घाई-गडबड करण्याऐवजी आरामात चहा बनवा. कारण, मूड ठिक नसेल तर, रेसीपीच्या चवीत फरक होऊ शकतो. याशिवाय, तुम्ही पाऊस सुरू असताना चहासोबत भजी किंवा बिस्किटे खाऊन मजा द्विगुणीत करू शकतात.

हेही वाचा - Chanakya Niti : एकटे राहण्याची भीती वाटते? सुचेनासं होतं? चाणक्यनीतीत सांगितलेत एकटे असण्याचे फायदे


सम्बन्धित सामग्री