Monday, September 01, 2025 04:06:10 AM

काय सांगता!! 10 दिवस अंथरुणावर पडून राहिल्यास तुम्हाला मिळतील 4.75 लाख रुपये! 'ही' कंपनी देत आहे खास ऑफर

या दहा दिवसांत त्याला सतत निरीक्षणाखाली ठेवले जाईल. प्रयोगादरम्यान, त्यांना त्यांच्या प्रियजनांशी बोलता यावे म्हणून मोबाईल फोन सोबत ठेवण्याची परवानगी असेल.

काय सांगता 10 दिवस अंथरुणावर पडून राहिल्यास तुम्हाला मिळतील 475 लाख रुपये ही कंपनी देत आहे खास ऑफर
European Space Agency
Edited Image

जर तुम्हाला फक्त झोपण्यासाठी कोणी पैसे दिले तर? हा विचार करूनचं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. युरोपियन स्पेस एजन्सीने एक प्रायोगिक कार्यक्रम आणला आहे ज्यामध्ये सहभागींना कोणतेही काम न करता 4.7 लाख रुपये दिले जातील. हा प्रयोग 10 दिवस चालेल ज्या दरम्यान स्वयंसेवक एका विशिष्ट स्थितीत राहतील. या दहा दिवसांत त्याला सतत निरीक्षणाखाली ठेवले जाईल. प्रयोगादरम्यान, त्यांना त्यांच्या प्रियजनांशी बोलता यावे म्हणून मोबाईल फोन सोबत ठेवण्याची परवानगी असेल. हा प्रयोग कसा असेल आणि त्यात सहभागींना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते? हे जाणून घेऊयात.

युरोपियन स्पेस एजन्सी पलंगावर झोपण्यासाठी देत आहे लाखो रुपये - 

दरम्यान, युरोपियन स्पेस एजन्सी 10 दिवसांच्या प्रयोगासाठी सहभागींना 4.75 लाख रुपये देण्याचा दावा करत आहे. सहभागींना कोणतेही काम करण्यास सांगितले जाणार नाही तर त्यांना फक्त एका विशिष्ट प्रकारच्या पलंगावर झोपावे लागेल. कंपनी त्यांच्या विवाल्डी प्रयोगाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या मोहिमेचे आयोजन करणार आहे. हे फ्रान्समधील टूलूस येथील MEDES स्पेस क्लिनिकमध्ये होईल.

हेही वाचा - Sunita Williams Salary: 9 महिन्यांनी अंतराळातून परतणाऱ्या सुनीता विल्यम्सला किती पगार मिळतो?

सहभागींचे शरीर मानेखालीपर्यंत पाण्यात बुडवले जाईल -  

या प्रयोगात सहभागींना 10 दिवस पाण्याच्या तळाशी तरंगावे लागेल. तथापि, सहभागी ओले होणार नाही कारण त्याच्या आणि पाण्यामध्ये एक वॉटरप्रूफ बेडशीट असेल. ज्यामुळे त्याला हवेत लटकल्यासारखे वाटेल. सहभागींना लघवी करण्यासाठी खास ट्रॉलीमध्ये नेले जाईल. त्यांना त्यांचे अन्न तरंगत्या फळीवर मिळेल. या काळात त्याचे शरीर मानेखालीपर्यंत पाण्यात बुडवले जाईल. फक्त हात आणि डोके पाण्याच्या वर राहतील. यामुळे शरीराला अवकाशात तरंगल्यासारखे वाटेल. ज्याद्वारे अवकाशातील शून्य गुरुत्वाकर्षणाची स्थिती समजू शकते.

हेही वाचा - Reliance Share: चंदीगडच्या तरुणाचे नशीब उजळले! 30 वर्षांपूर्वी 300 रुपयांना खरेदी केलेल्या RIL शेअर्सची किंमत ऐकून लावाल डोक्याला हात

अंतराळ प्रवासासाठी नवीन वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित करण्यास होणार मदत - 

या प्रयोगाचा उद्देश अंतराळवीरांच्या शरीरावर होणारे परिणाम समजून घेणे आहे. यामुळे भविष्यातील अंतराळ प्रवासासाठी नवीन वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत होईल. याशिवाय, दीर्घकाळ अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांवर आणि वृद्धांवर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.


सम्बन्धित सामग्री