विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये भाजपाला विधानसभा निवणुकीत मोठे यश मिळाले. नागपूर दक्षिण-पश्चिम येथून देवेंद्र फडणवीस यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. तर, भाजप एकट्याने 130 जागांवर आघाडी घेतली. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित होणार असल्याचं बोलल जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला प्रचंड असं बहुमत मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आता मुख्यमंत्रीपदी आरएसएस आणि भाजपकडून हायकमांडची पसंती असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात आज संध्याकाळी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री आपलाच असावा हे महायुतीतील तिन्हीही पक्षांना वाटत आहे. परंतु नक्की मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.