Wednesday, August 20, 2025 09:15:06 PM

भारताचा पाकिस्तानकडून दारुण पराभव

आशिया चषक अंडर 19 स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा मोठा पराभव केलाय. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 281 धावांचा डोंगर उभार करत भारतासमोर 282 धावांचे आव्हान दिले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या 282 धावांच्या आ

भारताचा पाकिस्तानकडून दारुण पराभव

दुबई - आशिया चषक अंडर 19 स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा मोठा पराभव केलाय. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 281 धावांचा डोंगर उभार करत भारतासमोर 282 धावांचे आव्हान दिले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या 282 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला केवळ 237 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताला 44 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. भारताकडून निखिल कुमार (Nikhil Kumar) आणि समर्थ नागराज (Samarth Nagaraj) यांनी चांगली कामगिरी केली. आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) याने देखील चमक दाखवली. मात्र, टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. 

भारताकडून मोहम्मद एनान (Mohamed Enaan) आणि युद्धजीतने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी केली. मात्र, भारताला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. इनानने 22 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 33 धावा केल्या आहेत. युद्धजीतने नाबाद राहत 12 धावा केल्या.

टीम इंडियाकडून आयुष मात्रे आणि वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हे सलामीला मैदानात उतरले होते. मात्र, वैभवला केवळ 1 रन काढता आला. तर आयुष 20 धावा करुन बाद झाला. त्याने 14 चेंडू खेळत 5 चौकार लगावले. आंद्रे सिद्धार्थ (Andre Siddharth) 15 धावा करत तंबूत परतला. तर कर्णधार मोहम्मद अमानला (Mohammad Amaan) काही खास कामगरी करता आली नाही. त्याने केवळ 16 धावा केल्या. तर निखिल कुमारने  (Nikhil Kumar) 67 धावांची खेळी केली. 

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 7 गडी गमावून 281 धावा केल्या. यादरम्यान शाहजेब खान (Shahzaib Khan) आणि उस्मान खान (Usman Khan) यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. शाहजैबने शतकी खेळीच्या जोरावर  पाकिस्तानला धावांचा डोंगर उभारता आला. त्याने 147 चेंडूंचा सामना करत 159 धावा केल्या. शाहजेबच्या या खेळीत 10 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. उस्माननेही अर्धशतक झळकावत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्याने 94 चेंडूंचा सामना करत 60 धावा केल्या. याशिवाय मोहम्मद रियाजुल्ला (Mohammad Riaz Ullah) यानेही 27 धावा केल्या. 
 

महत्त्वाचे मुद्दे -

भारताचा पाकिस्तानकडून दारुण पराभव
आशिया चषकातील सामन्यात 44 धावांनी मिळवला विजय


सम्बन्धित सामग्री