Thursday, August 21, 2025 12:04:15 AM

IPL 2025 आधीच KKR च्या समस्या वाढल्या, प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त

आयपीएल २०२५ (IPL 2025) स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापू्र्वी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs Pakistan) या दोन्ही संघांमध्ये टी-२० (T-20 )म

ipl 2025 आधीच kkr च्या समस्या वाढल्या
प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त

मुंबई - आयपीएल २०२५ (IPL 2025) स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापू्र्वी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs Pakistan) या दोन्ही संघांमध्ये टी-२० (T-20 )मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया (Anrich_Nortje) मालिकेतून बाहेर पडला आहे. हा दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा धक्का आहेच, यासह कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाच्या टेन्शनमध्येही वाढ झाली आहे.

एनरिक नॉर्खिया दुखापतीमुळे (due to injury) पहिला कसोटी (Test) सामनाही खेळू शकला नव्हता. सराव करत असताना त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. बुधवारी स्कॅन केलं असता, फ्रॅक्चर असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. एनरिक नॉर्खियाची रिप्लेसमेंट म्हणून दयान गेलीमला संघात स्थान दिलं गेलं आहे. 

सौदी अरेबियातील (Saudi Arabia) जेद्दाहमध्ये (Jeddah) आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव पार पडला होता. या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने एनरिक नॉर्खियाला ६ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले होते. त्याच्याकडे या संघातील प्रमुख गोलंदाज म्हणून पाहिलं जात होतं. मात्र आता तो दुखापतग्रस्त झाला आहे. नॉर्खिया गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळताना दिसून आला होता. दरम्यान आयपीएल सुरु व्हायला अजूनही ३ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे तो पूर्णपणे फिट होऊन मैदानात परतणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


कोलकाता नाइट रायडर्स संघातील फलंदाज - 

रिंकू सिंग

क्विंटन डी कॉक (द. आफ्रिका)

अंगक्रिश रघुवंशी

रहमानुल्लाह गुरबाज ( अफगाणिस्तान)

मनीष पांडे

लवनीत सिसोदिया

अजिंक्य रहाणे

ऑल राउंडर

सुनील नरेन (वेस्ट इंडिज)

आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज)

रमनदीप सिंग

वेंकटेश अय्यर

रोव्हमन पॉवेल (वेस्ट इंडिज)

मोईन अली (इंग्लंड)

गोलंदाज

वरून चक्रवर्ती

हर्षित राणा

ऑनरिक नॉर्खिया (द. आफ्रिका)

वैभव अरोरा

मयंक मार्कंडे

स्पेन्सर जॉन्सन ( ऑस्ट्रेलिया)

अनुकूल रॉय
 


सम्बन्धित सामग्री