Monday, September 01, 2025 04:03:43 AM

मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारला नवा अल्टीमेटम

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणवीस म्हटले असतील तर चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी दिलीय. लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, समाज तुमचं अभिनंदन करेल.

मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारला नवा अल्टीमेटम

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सतत लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला एक नवा अल्टीमेटम दिला आहे. ५ जानेवारी २०२४ पर्यंत सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर निर्णय घ्यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांनी महायुती सरकारला शुभेच्छा दिल्या असल्या तरी, आता जनतेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

जरांगे म्हणाले, "आता नाटकबाजी थांबवून, गंभीरपणे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची आवश्यकता आहे. सरकारने जर ५ जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मराठा समाज पुन्हा आंदोलन करू आणि सरकारला परेशान करेल," असा इशारा त्यांनी दिला.

मराठा आरक्षणासाठी आधीपासूनच संघर्ष करणारे जरांगे हे सरकारवर सतत दबाव निर्माण करत आहेत. त्यांनी आपल्या आंदोलनाच्या पुढील मुद्द्याविषयीही तसे संकेत दिले. "मराठा समाजाच्या प्रश्नासाठी सामूहिक आमरण उपोषणाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल," असेही त्यांनी सांगितले. जरांगे यांनी महायुती सरकारला आवाहन केले की, "तुम्ही जनतेच्या मनावर काम करा. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांच्या प्रश्नांचे समाधान करणे आवश्यक आहे."  मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकारच्या अगदी प्राथमिक बाबींपैकी एक असावा, आणि त्यावर त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणवीस म्हटले असतील तर चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी दिलीय. लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, समाज तुमचं अभिनंदन करेल असं जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाला उत्तर देताना म्हटलय. आम्ही आमच्या उपोषणावर ठाम असल्याचं सांगत आमचा समाज बरळवाडी करणाऱ्याला किंमत देत नाही असं जरांगे म्हणालेत.


सम्बन्धित सामग्री