Champions Trophy 2025: जसप्रीत बुमराह बाहेर, टीम इंडियाला मोठा धक्का; बुमराह ऐवजी नवा खेळाडू
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. याबाबत बीसीसीआयने मोठी अपडेट दिली आहे. बीसीसीआयने आपला सुधारित संघ जाहीर केला असून यात दोन बदल करण्यात आले आहेत. यात बुमराहच्या जागेवर आणि जयस्वी जयस्वालच्या जागेवर नव्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना शेवटच्या सामन्यात पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याच्यावर बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटरमध्ये उपचार सुरू होते. चॅम्पियन टॉफीमध्ये बुमराह खेळणे टीम इंडियासाठी आवश्यक होते. त्यासाठी देशभरातील टीम इंडियाचे चाहते हे बुमराहची दुखापत कमी व्हावी, यासाठी प्रार्थना करत होते.
जसप्रीत बुमराहच्या पाठीचे स्कॅन करण्यात आले. तेव्हा त्यात त्याची दुखापत बरी झालेली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे अखेर बीसीसीआने अधिकृतरित्या घोषणा करून टीम इंडियाच्या चाहत्यांना ही वाईट बातमी दिली. याशिवाय भारताच्या संघात बुमराहच्या जागी बदली खेळाडू म्हणून हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा - National Games 2025: देव कुमार मीनाने पोल व्हॉल्टमध्ये जिंकले सुवर्णपदक
एका क्रीडा वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. बंगळुरूमध्ये बुमराहच्या पाठीचे स्कॅन करण्यात आले. यामध्ये तो पूर्णपणे बरा नसल्याचे दिसून आले. पुढील काही आठवड्यात तो धावू शकेल आणि नंतर हळूहळू गोलंदाजी करण्यास सुरुवात करेल, अशी शक्यता आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम बुमराहच्या फिटनेसवर लक्ष ठेऊन आहे.
हेही वाचा - जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाही ?
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. त्यामध्ये जसप्रीत बुमराहचा समावेश करण्यात आला होता. आता बुमराह बाहेर पडल्याने, बीसीसीआयला सुधारित संघ जाहीर करावा लागला. यामध्ये बुमराहच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले आहे. राणाने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेद्वारे वनडेत पदार्पण केलं आहे. त्याने या मालिकेत आपली छाप सोडली आहे. यामुळं बुमराहच्या जागेवर संघात स्थान देण्यात आले.
चॅम्पियन्स ट्रॉफी अशी आहे टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत(यष्टीरक्षक), केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जाडेजा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा,
रिझर्व्ह खेळाडू - यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज, शिवम दुबे.