मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराडवरून राजकीय चिखलफेक सुरूच आहे. कराडचे राजकीय संबंध कोणाकोणाशी आहे हे दाखवण्याचा सत्ताधारी-विरोधकांकडून प्रयत्न होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटची चर्चा सध्या सगळीकडे दिसत आहे.
हेही वाचा : आमदार धसांचा अजित पवारांवर निशाणा
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज शरद पवारांचे खासदार बजरंग सोनवणेंचा वाल्मिक कराडसोबतचा एक फोटो ट्विट केला आहे आणि त्यावर "लई अवघड हाय गड्या उमगाया "बाप्पा "रं" अशी टिप्पणी केली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटनंतर राजकीय चर्चांणा उधाण आले आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापाल्याचे पाहायला मिळाले. या हत्येनंतर तेथील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी हे प्रकरण उचलून धरले. याच पार्श्वभूमीवर आज परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड नाव आरोपी म्हणून समोर आले. कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली. मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात आला. बीडचे खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने या प्रकरणी टीकास्त्र डागले जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मात्र, आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी वाल्मिक कराड आणि बजरंग सोनावणे यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे राजकीय चर्चा होत आहेत. वाल्मिक कराड आणि आमदार सोनावणे यांचा काही संबंध आहे का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.