Wednesday, August 20, 2025 09:27:27 AM

Krishna Janmashtami 2025: आज श्रीकृष्ण पूजेसाठी ‘ही’ 43 मिनिटे अत्यंत शुभ, यावेळेत पूजा केल्यास पूर्ण होतील सर्व मनोकामना; जाणून घ्या

यंदा कृष्ण जन्माष्टमी 16 ऑगस्ट रोजी असून, पूजेचा उत्तम मुहूर्त आज मध्यरात्री 12:04 ते 12:47 असा 43 मिनिटांचा आहे. यावेळी 6 शुभ योगांचा संगम होणार असून भक्तांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

 krishna janmashtami 2025 आज श्रीकृष्ण पूजेसाठी ‘ही’ 43 मिनिटे अत्यंत शुभ यावेळेत पूजा केल्यास पूर्ण होतील सर्व मनोकामना जाणून घ्या

Krishna Janmashtami 2025:भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. भक्तगण या दिवशी उपवास, भजन-कीर्तन आणि निशीथकाळातील विशेष पूजन करून श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव साजरा करतात. पौराणिक मान्यतेनुसार, रोहिणी नक्षत्राच्या रात्री भगवान विष्णूंच्या आठव्या अवताराचा जन्म झाला होता.

यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी 16 ऑगस्ट 2025 रोजी शनिवारी आहे. पण पूजेचा अत्यंत शुभ मुहूर्त मध्यरात्रीच्या काही खास क्षणांमध्ये आहे. द्रिक पंचांगानुसार, अष्टमी तिथी 15 ऑगस्ट रोजी रात्री 11:49 वाजता सुरू होईल आणि 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:34 वाजता समाप्त होईल.

पूजेचा उत्तम मुहूर्त
भगवान श्रीकृष्णाची निशीथकाळातील पूजा विशेष फलदायी मानली जाते. यंदा हा सर्वोत्तम मुहूर्त आज मध्यरात्री 12:04 ते 12:47 या 43 मिनिटांचा आहे. या कालावधीत विधीपूर्वक श्रीकृष्णांचे पूजन केल्यास भक्तांना इच्छित मनोकामना पूर्ण होण्याचे आशीर्वाद मिळतात, असे मानले जाते.

हेही वाचा: Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमी मध्यरात्री का साजरी केली जाते? काय आहे त्यामागील आध्यात्मिक कारण? जाणून घ्या

यंदा जन्माष्टमीला 6 शुभ योगांचा संगम
ज्योतिषाचार्यांच्या मते, यंदाच्या जन्माष्टमीला अनेक शुभ संयोग लाभले आहेत. बुधादित्य योग, गजलक्ष्मी योग, अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, वृद्धि योग आणि ध्रुव योग यांचा संगम होणार आहे. या योगांमुळे संपत्ती, सौभाग्य आणि आरोग्यवृद्धीचे विशेष फळ प्राप्त होते.
असेही मानले जाते की, गजलक्ष्मी योगामध्ये केलेले पूजन विशेषत: आर्थिक स्थैर्य देणारे ठरते, तर सर्वार्थ सिद्धी योग जीवनातील अनेक अडथळे दूर करतो.

व्रत पारणाचा मुहूर्त
अनेक भक्त या दिवशी उपवास ठेवतात काही जण फलाहार करून, तर काही पूर्ण निर्जला व्रत पाळतात. व्रत पारणासाठी यंदा दोन पर्याय आहेत.17 ऑगस्ट रोजी सकाळी 5:51 हा पहिला शुभ मुहूर्त आहे.
 जे भक्त मध्यरात्री पूजनानंतर पारण करू इच्छितात, ते 17 ऑगस्ट रोजी रात्री 12:47 नंतर करू शकतात.

हेही वाचा: Shri Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीला जन्मलेल्या मुलांसाठी श्रीकृष्णाची ही सुंदर नावे अर्थासहित

पूजेची तयारी आणि विधी
जन्माष्टमीच्या पूजेसाठी गोपाळाचा बालरूपातील साज, झुला, तुळशीपत्र, पाच प्रकारची फळे, पंचामृत, माखन-मिश्री, फुलं आणि दीपाची व्यवस्था केली जाते. रात्री निशीथकाळी श्रीकृष्णाचा जन्म समजून आनंदोत्सव साजरा केला जातो, भजन-कीर्तन गायले जाते आणि मंदिरांमध्ये खास सजावट केली जाते.

भक्तांसाठी संदेश
जन्माष्टमी केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, प्रेम आणि भक्तीचा महापर्व आहे. यंदा 6 शुभ योगांचा संगम आणि 43 मिनिटांचा हा दुर्मिळ पूजामुहूर्त भक्तांसाठी सुवर्णसंधी मानला जातो. या क्षणी भगवान श्रीकृष्णाचे स्मरण, नामजप आणि पूजन केल्याने आयुष्यात सुख, समृद्धी आणि सद्भावना वाढते, असे संतांनी सांगितले आहे.

Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही. 


सम्बन्धित सामग्री