मुंबई : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्या महिलांवर कारवाई सुरू झाली आहे. यानुसार धुळे जिल्ह्यात एका महिला लाभार्थ्याला मिळालेले साडेसात हजार सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
धुळ्यात महिला लाभार्थीने लाडकी बहीण योजनेचा दुहेरी लाभ घेतल्याचे समोर आले. म्हणून सरकारने हे साडेसात हजार सरकारने जमा करून घेतले आहेत. सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी महायुती सरकारकडून करण्यात आली. सुरूवातीला महायुतीच्या सरकारने सरसकट सगळ्या महिलांच्या खात्यात रक्कम जमा केली. आता महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आले आहे. आता या अर्जांची छाननी होणार असल्याचा निर्णयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतल्यानंतर अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे.
हेही वाचा : बीड हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पोलिसांच्या ताब्यात
लाडकी बहीण योजनेचा दोनवेळा लाभ घेतलेले चौकशीत आढळल्याने महिलांकडून पैसे परत घेतले जाणार आहेत. धुळे जिल्ह्यातील महिलेचे पैसे परत घेण्यात आले आहेत. खैरनार नावाच्या महिलेने दोनवेळा योजनेचा लाभ घेतल्याचे चौकशीत आढळून आल्याने सरकारने पैसे जमा करून घेतले आहेत.
लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरूवात होत आहे. ज्या महिला निकषांमध्ये बसत नाहीत त्यांचे अर्ज अपात्र करण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अर्जाची छाननी केली जात आहे. केसरी आणि पिवळे रेशनकार्ड वगळून सर्वच अर्जांची छाननी होणार आहे.