Wednesday, August 20, 2025 09:31:12 AM

Mumbai Rain: मुंबईकर पावसाच्या धारांपेक्षा घामाच्या धारांनी हैराण, उन्हाळ्यासारखा उकाडा

पावसाचं प्रमाण खूप कमी झालं असून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकर हैराण झाले आहेत. कोकणातही जोरदार पावसाची शक्यता नाही.

mumbai rain मुंबईकर पावसाच्या धारांपेक्षा घामाच्या धारांनी हैराण उन्हाळ्यासारखा उकाडा

मुंबई : श्रावण महिना म्हणजे तसं म्हटलं तर ऊन-पावसाचा खेळ. पण ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाचं प्रमाण खूप कमी झालं असून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकर हैराण आहेत. ऋतू पावसाळ्याचा असला तरी मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवतो आहे. तर, पुढील 24 तासांचा हवामानाचा अंदाज पाहूया.

गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी अधूनमधून बरसत आहेत. पण समुद्रकाठ आणि ऊन वाढल्यामुळे वातावरणात दमटपणा आणि उकाडा वाढलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईकरांवर घामाच्या धारांनी हैराण होण्याची वेळ आली आहे. सध्या मोठ्या पावसाची फारशी शक्यता नाही. फक्त हवामान ढगाळ राहणार आहे.

पावसाच्या हलक्याशा सरी पडू शकतात, मात्र मुसळधार पावसाचा इशारा नाही. कमाल तापमान सुमारे 30°C, तर किमान तापमान 27°C दरम्यान राहील. हवेत दमटपणा अधिक असल्यामुळे उकाडा अधिक जाणवेल. जोरदार पावसाची शक्यता नसल्याने लोकल सेवा आणि रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत राहील. मात्र, उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा - दोन्ही भाऊ महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार का?

ठाणे आणि नवी मुंबई परिसरात काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. संध्याकाळी वातावरण अधिक दमट होण्याची शक्यता असून, ढगाळ हवामान कायम राहील. कमाल तापमान 30–31°C, तर किमान तापमान 25–27 C दरम्यान राहील. या भागात जोरदार पावसाचा अंदाज नसला तरी अधूनमधून सरी बरसू शकतात.

पालघर जिल्ह्यात आज आंशिक ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी असून, काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. दमट हवामानामुळे उष्णता अधिक जाणवेल. कमाल तापमान 31°C, तर किमान तापमान 25-26°C दरम्यान राहील. पावसाचा जोर नसल्यामुळे जनजीवन सुरळीत राहण्याची अपेक्षा आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता फारशी नाही. काही भागात हलक्या सरींची शक्यता आहे, परंतु मुसळधार पावसाचा कोणताही इशारा नाही. कमाल तापमान 30–31°C, तर किमान तापमान 24–25°C दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरणामुळे दमटपणा वाढेल आणि उष्णता जाणवेल.

हेही वाचा - Navi Mumbai : उंदराने खाल्लेले आईसक्रीम ग्राहकांना; सीवूड्स मॉलमध्ये अजब प्रकार


सम्बन्धित सामग्री