Mahashivratri 2025: हिंदू धर्मामध्ये व्रत-वैकल्यांना खूप महत्त्व आहे. त्यातही महाशिवरात्रीला खूप महत्त्वपूर्ण आणि सर्वांसाठीच शुभ मानले जाते. आज (26 फेब्रुवारी) महाशिवरात्री साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान महादेवांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा-आराधना आणि व्रत केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, आज महशिवरात्रीच्या शुभ दिनी काही ग्रहदेखील दुर्लभ योग निर्माण करणार आहेत. असा योग जवळपास 152 वर्षानंतर निर्माण होत आहे. यामुळे काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार आहे. या राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, इतरही अनेक शुभ परिणाम जाणवतील.
कशी आहे ग्रहस्थिती?
महाशिवरात्रीला शुक्र उच्च राशी मीनमध्ये राहणार असून राहूदेखील याच राशीत विराजमान असेल. तर, सूर्य शनिदेवांची रास असलेल्या कुंभ राशीमध्ये असेल. असा योग जवळपास 152 वर्षानंतर निर्माण होत आहे, यामुळे काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार आहे. या राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, इतरही अनेक शुभ परिणाम जाणवतील.
हेही वाचा - Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीला चुकूनही पिऊ नका नशा चढणारी भांग, होतील 'हे' गंभीर परिणाम.. मेंदूला कायमस्वरूपी..
महाशिवरात्री 2025 हा दिवस या तीन राशींसाठी विशेष लाभदायी
मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी निर्माण होणार शुभ योग खूप लाभदायी असेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. सरकारी कामात मदत मिळेल. या काळात अनेक लाभदायी परिणाम पाहायला मिळतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. अचानक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.
मिथुन
मिथुन राशीसाठी देखील हा योग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान-सन्मान, यश-कीर्ती वाढेल. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील.
हेही वाचा - Welcome Your Baby : डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना करा अशी तयारी, 'या' वस्तू बॅगेत आधीच भरून ठेवा
मकर
हा शुभ संयोग मकर राशीच्या व्यक्तींचे भाग्य बदलेल. मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. नवी नोकरी मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)