Thursday, September 04, 2025 02:26:21 AM

'राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार'

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार

मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते आझाद मैदानावर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते. हरियाणाच्या निकालाची महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदान करा, आळस करू नका असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. 

उद्धव कोविडला घाबरून बिळात लपले. त्यांनी सत्तेत असतात अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार केला. कोविड काळात टाळुवरचं लोणी खाल्लं, असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला. याउलट कोविड काळातही जनहितासाठी काम केले. प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यासाठी काम केले असे सांगत एकनाथ शिंदेंनी उद्धव यांच्यावर टीका केली. 'होती दाढी म्हणून उध्वस्त केली महाविकास आघाडी' अशी काव्यात्मक रचना सादर करत मविआची कोंडी केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मविआला मुख्यमंत्री या पदासाठी उद्धव अमान्य आहे. याउलट महायुती विकासाच्या मुद्यावर ठामपणे एकमताने आणि एकदिलाने काम करत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी मुंबईत खड्डेमुक्त रस्ते करणार, राज्याची अर्थव्यवस्था पुढील तीन वर्षात दीड ट्रिलियन डॉलर एवढी मोठी करणार करणार असल्याची ग्वाही दिली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

'कोविडला घाबरून बिळात लपलो नाही'
मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धवना चिमटा
'मला कमकुवत समजू नका'
'होती दाढी म्हणून उध्वस्त केली महाविकास आघाडी'
एकनाथ शिंदेंची मविआवर कवितेतून टीका
'मविआला मुख्यमंत्री पदासाठी उद्धव अमान्य'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाणला टोला
'हरियाणाच्या निकालाची महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होणार'
'राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भविष्यवाणी
'विधानसभेला मतदानात आळस करू नका'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

दसरा मेळाव्यातील इतर नेत्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

विधानसभेवर भगवा फडकवू - रामदास कदम

'आमचं सरकार, सगळ्यांचे सरकार'
शिवसेनेचे नेता गुलाबराव पाटील यांचा दावा

नाच रे मोरा, उद्धवच्या पोरा - ज्योती वाघमारे
उद्धव नव्हे सरडा - ज्योती वाघमारे
'मातोश्री'चं नाव 'अम्मीजान' करणार का ? - ज्योती वाघमारे


सम्बन्धित सामग्री