Monday, September 01, 2025 02:45:59 AM

मुंडे कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ; अंजली दमानियांचा आरोप

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी पत्रकार परिषद घेत दमानिया यांनी भाष्य केले आहे.

मुंडे कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ अंजली दमानियांचा आरोप

मुंबई : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगवेगळे धागेदोरे समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर गंभीर होत असून तोच मुख्य आरोपी असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांच्याकडून केला जात आहे. कराड पुण्यातून पोलिसांना सरेंडर झाला. कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने मंत्री मुंडेंवर देखील आरोप होत आहेत. नुकतच या प्रकरणात पुण्यातून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : पोलिसांकडून खासदार सोनावणेंना धमकी

अंजली दमानिया यांच्या ट्विट पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे. देशमुख हत्या प्रकरणात तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून सीआयडी आणि एसआयटी लावण्यात आली आहे. याच एसआयटीमधील अधिकाऱ्यांवर दनामिया यांनी संशय व्यक्त केला होता. दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत बीड हत्याप्रकरणावर भाष्य केले आहे. नरेंद्र सांगळे नामक व्यक्तीकडून धमकीचा फोन आल्याचे त्यांनी सांगितले. देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंवर सातत्याने आरोप होताना दिसत आहेत. मुंडे भाऊ- बहिणीकडून वंजारी समाजाचा वापर केला जात असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

मस्साजोग गावच्या सरपंच हत्येनंतर दमानिया यांनी सातत्याने या प्रकरणातील एक एक खुलासे समोर आणले आहेत. त्यामुळे बीडमधून धमकीचे फोन येत आहेत मुंडे कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ होत आहे असे त्यांनी सांगितले आहे. धमकीचे 700 ते 800 फोन आले. मुंडे निकटवर्तीयाकडून माझ्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. तपास पथकात कराडचे निकटवर्तीय आहेत. लवकरात लवकर एसआयटी बरखास्त करा असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

दमानिया यांनी एसआयटीमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे. वाल्मिक कराडसोबत एका पोलिस अधिकाऱ्याचा फोटो शेअर करत हल्लाबोल केला होता. दमानिया यांनी म्हटले की, एसआयटी निष्पक्ष चौकशी करणार का? संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या SIT मधे हे महेश विघ्ने ? ह्या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का ? बीड चे अधिकारी बीडच्या बॉसची निष्पक्ष चौकशी करणार? आणि एक अधिकारी मनोज वाघ देखील कराड यांचे निकटवर्ती आहेत असे माध्यमांमधून कळते अशी पोस्ट दमानिया यांनी केली होती.

 


सम्बन्धित सामग्री