Microsoft Outlook Down: मायक्रोसॉफ्टच्या लोकप्रिय सेवा आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये मोठा बिघाड झाला, ज्यामुळे जगभरातील हजारो वापरकर्त्यांना समस्या निर्माण झाल्या. या बिघाडामुळे जगभरातील हजारो वापरकर्त्यांसाठी मायक्रोसॉफ्ट आउटलुक (Microsoft Outlook) डाउन झाले. वापरकर्त्यांनी ईमेल लॉगिन, मेसेज अॅक्सेस आणि इतर सेवांमध्ये समस्या येत असल्याची तक्रार केली. तथापि, कंपनीने पुष्टी केली की, ही समस्या सोडवली गेली आहे आणि त्यामागील कारण तपासले जात आहे.
आउटलुक आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमधील समस्येमुळे, अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर याबद्दल संताप व्यक्त केला. एका वापरकर्त्याने लिहिले, 'आउटलुक काम करत नाहीये, आणखी कोणी या समस्येचा सामना करत आहे का?' दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, 'मी माझा पासवर्ड तीन वेळा बदलला, नंतर कळले की आउटलुक बंद आहे!'
हेही वाचा - Microsoft Shut Down Skype: मायक्रोसॉफ्ट स्काईप अॅप बंद करणार; वापरकर्त्यांना Teams वर करता येणार Data Transfer
वापरकर्त्यांनी Downdetector वर नोंदवली तक्रार -
आउटेज मॉनिटरिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरनुसार, 37,000 हून अधिक वापरकर्त्यांनी आउटलुकमध्ये समस्या नोंदवल्या. 24,000 हून अधिक वापरकर्त्यांनी Microsoft 365 सेवांमध्ये त्रुटींची तक्रार केली. काही वापरकर्त्यांना Microsoft Teams मध्ये प्रवेश करण्यातही समस्या आल्या.
मायक्रोसॉफ्टने दिले स्पष्टीकरण -
आम्ही आउटेजचे संभाव्य कारण ओळखले आहे आणि संशयास्पद कोड काढून टाकला आहे, असे मायक्रोसॉफ्टने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. बाधित सेवा हळूहळू पूर्ववत होत आहेत. कंपनीची तांत्रिक टीम या समस्येवर लक्ष ठेवून आहे आणि लवकरच यावर संपूर्ण तोडगा काढण्यात येईल, असं मायक्रोसॉफ्टने म्हटलं आहे.
हेही वाचा - WhatsApp Down: व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यात अडचण, हजारो वापरकर्त्यांनी केली Outage संदर्भात तक्रार
कोणत्या देशांमध्ये उद्भवल्या समस्या ?
या आउटेजमुळे शिकागो, न्यू यॉर्क आणि लॉस एंजेलिससह अनेक शहरांमधील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. जगभरातील व्यवसाय आणि संस्थांसाठी मायक्रोसॉफ्ट 365 आणि आउटलुक या महत्त्वाच्या सेवा आहेत. त्यामुळे या सेवांचा लाभ घेणाऱ्या अनेक वापरकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागला.