Myanmar Earthquake: भारताचा शेजारी देश म्यानमार भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, शुक्रवारी म्यानमारमध्ये दोन तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. दोन्ही भूकंपांची तीव्रता 7 किंवा त्याहून अधिक होती. भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत. या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण जाले आहे.
पहिल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल -
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये पहिला भूकंप शुक्रवार 28/03/2025 रोजी सकाळी 11:50 वाजता झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 मोजण्यात आली. या भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या आत 10 किलोमीटर अंतरावर होते.
हेही वाचा - 'रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच मरणार!' झेलेन्स्की यांच्या विधानामुळे खळबळ
दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 7.0 रिश्टर स्केल होती -
शुक्रवारी पहाटे 12:02 वाजता म्यानमारमध्ये दुसरा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. हा भूकंप धोकादायक देखील होता आणि त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.0 इतकी होती. या भूकंपाचे केंद्रही पृथ्वीच्या आत 10 किलोमीटर अंतरावर होते.
हेही वाचा - भारत व पाकिस्तान अमेरिकेपेक्षाही सुरक्षित! जाणून घ्या जगातील असुरक्षित देशांची यादी
गेल्या काही दिवसांत भारतासह जगभरात भूकंपाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. खरं तर, आपल्या पृथ्वीच्या आत 7टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स त्यांच्या जागी सतत फिरत असतात. तथापि, या प्लेट्स कधीकधी फॉल्ट लाईन्सवर आदळतात, ज्यामुळे घर्षण होते. या घर्षणातून बाहेर पडणारी ऊर्जा बाहेर पडण्याचा मार्ग शोधते. या कारणास्तव, पृथ्वीवर भूकंपाच्या घटना घडतात.