Thursday, August 21, 2025 02:53:45 AM

नालासोपारा हादरलं! मुलीने केले बापावर वार

नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या घटनेने नालासोपारा हादरल्याचं पाहायला मिळालंय. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळतंय.

नालासोपारा हादरलं मुलीने केले बापावर वार

नालासोपारा: नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या घटनेने नालासोपारा हादरल्याचं पाहायला मिळालंय. नालासोपारातील संतोष भवन येथे सावत्र वडिलांकडून होणार्‍या लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने वडिलांवर चाकूने हल्ला केला. याआधी देखील महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या मात्र  या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळतंय. 

हेही वाचा: Akola: तब्बल 2 तास शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी दिले महिलेला जीवनदान

काय आहे प्रकरण? 
24 वर्षीय तरुणी नालासोपारा पुर्वेच्या संतोष भवन येथील सर्वोदनय नगर चाळीत राहत होती .  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या आईने दुसरे लग्न केले होते. तिचे सावत्र वडील रमेश भारती हे मागील दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. सोमवारी देखील त्यांनी तिच्यावर शरीरसंबंध बनविण्यासाठी दबाव टाकला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रमेश भारती याने शरीरसंबंधाची मागणी केल्यावर तिने हल्ल्याची योजना बनवली. हे करण्यासाठी लाज वाटते असे सांगून तिच्या वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मग अचानक हल्ला केला आणि गुप्तांग कापून टाकले.

याच अवस्थेमध्ये हा नराधम बाप घराबाहेर पडला आणि रस्त्यावर आला त्यानंतर या मुलीने वडिलांवर चाकूने वर केले. याचे व्हिडिओ देखील स्थानिक लोकांनी काढला असल्याचं समोर आलं असून माझ्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याने मी वर का केला असल्याचं या तरुणीने सांगितलेय. याप्रकरणी पोलीस आता आणखी खोलात तपास करून असून महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय. 


सम्बन्धित सामग्री