Thursday, August 21, 2025 12:04:00 AM

मतदार संघाचा विकास करणार - नीलेश राणे

आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात विविध विकास कामे पूर्ण केली जातील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मतदार संघाचा विकास करणार - नीलेश राणे

कुडाळ-मालवण: सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळाली. विधानसभा निवडणुकीत राणे बंधूनी बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे तर कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे या दोन्ही बंधूंनी निवडणुक जिंकली.याच अनुषंगाने आमदार नीलेश राणे यांनी त्यांच्या मतदार संघातील विकासाच्या दृष्टीने एक मोठा निर्धार केला आहे. आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात विविध विकास कामे पूर्ण केली जातील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले आमदार निलेश राणे? 
निलेश राणे म्हणाले की दहा वर्षांनतर मी या पदावर आलो आहे, पण पद हे मिरवण्यासाठी नसतं तर काम करण्यासाठी असतं विधीमंडळ हे महाराष्ट्राचे आहे त्याला एक वेगळं महत्व आहे. म्हणून मला वाटतं आहे की मला माझ्या मतदारसंघासाठी काम करायचं आहे. 


सम्बन्धित सामग्री