PF amount can be withdrawn through ATM card
Edited Image
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. पीएफशी (PF) संबंधित एक नवीन नियम येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ आपल्या पीएफ ग्राहकांच्या सुविधांची पूर्णपणे काळजी घेते. आता ही संघटना एक विशेष सेवा सुरू करत आहे. ज्याचा फायदा देशातील कोट्यवधी पीएफ ग्राहकांना होणार आहे. आता पीएफ ग्राहक युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) द्वारे पीएफचा दावा करू शकतील.
ईपीएफओच्या नवीन प्रणालीमुळे पीएफ ग्राहकांच्या लिंक केलेल्या यूपीआय आयडीवर निधी हस्तांतरण करता येईल. अहवालांनुसार, EPFO ने UPI एकत्रीकरणासाठी आधीच एक ब्लूप्रिंट तयार केला आहे आणि ही सुविधा पुढील 2 ते 3 महिन्यांत लागू होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा - चुकीचे चलन जारी झाल्यास तक्रार कोठे करावी? जाणून घ्या ऑफलाइन आणि ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया
डिजिटल पेमेंट अॅप्सवरून PF रक्कम मिळणार?
रिपोर्ट्सनुसार, EPFO नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत PF पैसे काढणे UPI प्लॅटफॉर्मशी एकत्रित करण्यासाठी चर्चा करत आहे. याद्वारे, पीएफ ग्राहक फोनपे, गुगलपे, पेटीएम आणि भीम अॅप सारख्या डिजिटल पेमेंट अॅप्सवरून त्यांची पीएफ रक्कम त्वरित मिळवू शकतात.
हेही वाचा - दररोज 27 कोटी रुपयांपर्यंत देणगी देणारे भारतातील सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती तुम्हाला माहित आहेत का?
ATM कार्डद्वारे काढता येणार PF ची रक्कम -
UPI व्यवहारांव्यतिरिक्त, EPFO एटीएममधून पीएफची रक्कम कशी काढता येईल, यावर काम करत आहे. दरम्यान, कामगार सचिव सुमिता डावरा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधी माहिती दिली. सुमिता डावरा यांनी सांगितलं की, 2025 पर्यंत ईपीएफओचे सदस्य एटीएमद्वारे त्यांचे पीएफ काढू शकतील. कामगार मंत्रालय संपूर्ण आयटी सेवा अपग्रेड करण्याच्या प्रक्रियेत आहे. यामुळे ईपीएफओमध्ये नोंदणीकृत भारतातील कर्मचाऱ्यांना मदत होईल.
तथापी, अहवालानुसार, ही प्रणाली पुढील वर्षी मे किंवा जूनमध्ये संपूर्ण भारतात लागू केली जाईल. असे म्हटले जात आहे की केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये योगदानावरील 12% मर्यादा काढून टाकू शकते.