Thursday, September 04, 2025 08:20:52 AM

ओमर अब्दुल्ला होणार जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री

जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वातील आघाडीचा विजय झाला. ओमर अब्दुल्ला हेच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होणार आहेत.

ओमर अब्दुल्ला होणार जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वातील आघाडीचा विजय झाला. त्यांनी ४७ जागांवर आघाडी / विजय मिळवला. विजय होत असल्याची जाणीव होताच नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला हेच जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होणार आहेत. 

ओमर अब्दुल्ला दुसऱ्यांदा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होणार आहेत. याआधी ५ जानेवारी २००९ ते ८ जानेवारी २०१५ या कालावधीत ते जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते. तसेच १५ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत जम्मू काश्मीर विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. ओमर अब्दुल्लांनी २३ जुलै २००१ ते २३ डिसेंबर २००२ या काळात वाजपेयींच्या सरकारमध्ये परराष्ट्र खात्यात राज्यमंत्री हे पद हाताळले होते. ते १० मार्च १९९८ ते १८ मे २००९ या कालावधीत लोकसभेत खासदार होते. 

ओमर अब्दुल्ला यांचे शिक्षण

इंग्लंडमधील एसेक्स प्रांतातील रॉचफोर्ड येथे ओमर अब्दुल्ला यांचा १० मार्च १९७० रोजी जन्म झाला. आता ५४ वर्षांचे असलेले ओमर अब्दुल्ला वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. श्रीनगरच्या बर्न हॉल स्कूल येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर ओमर अब्दुल्लांचे वास्तव्य मुंबईत शरद पवारांच्या घरी होते. त्यांनी मुंबईत सिडन्हॅम महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. 


सम्बन्धित सामग्री