Sunday, August 31, 2025 06:10:42 AM

School Recruitment Scam: शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेस आमदार जीवन कृष्णा साहा यांना अटक

तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्ण साहा यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी छापे टाकले होते. त्यानंतर आता आज जीनव साहा यांना अटक करण्यात आली आहे.

school recruitment scam शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी तृणमूल काँग्रेस आमदार जीवन कृष्णा साहा यांना अटक

TMC MLA Jiban Krishna Saha Arrest: पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्ण साहा यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी छापे टाकले होते. त्यानंतर आता आज जीनव साहा यांना अटक करण्यात आली आहे. शालेय शिक्षक भरतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्याची माहिती मिळताच आमदार साहा यांनी घराच्या भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा पाठलाग करून त्यांना जवळच पकडण्यात आले. 

हेही वाचा - Himachal Rain: हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, 3 राष्ट्रीय महामार्ग, 400 हून अधिक रस्ते बंद; चंबा येथे ढगफुटी, 5 जिल्ह्यांची स्थिती बिकट

सध्या ईडीचे अधिकारी त्यांची सखोल चौकशी करत आहेत. या कारवाईसाठी बीरभूम जिल्ह्यातील एका व्यक्तीकडून मिळालेल्या पैशांच्या व्यवहाराशी संबंधित माहितीच्या आधारे साहा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. या प्रकरणी साहा यांच्या पत्नीची देखील यापूर्वी चौकशी करण्यात आली होती. 

हेही वाचा - Greater Noida Dowry Murder Case: पत्नीला जाळून मारणाऱ्या आरोपी विपिनचे पोलिसांकडून एन्काउंटर; पायावर झाडली गोळी

एप्रिल 2023 मध्ये सीबीआयनेही याच शालेय भरती घोटाळ्याच्या संदर्भात जीवन कृष्ण साहा यांना अटक केली होती. मात्र, त्यांना मे 2023 मध्ये जामीन मिळाला होता. सध्या ईडी या घोटाळ्याच्या मनी लाँड्रिंग पैलूची चौकशी करत आहे, तर सीबीआय गुन्हेगारी व्यवहारांशी संबंधित बाबींचा तपास करत आहे. या कारवाईमुळे तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला असून राज्यातील राजकीय वातावरणातही खळबळ उडाली आहे. 


सम्बन्धित सामग्री