Sunday, August 31, 2025 05:46:42 AM

Hair Tips In Marathi : आता दुतोंडी केसांपासून मिळवा मुक्ती; हे सोपे घरगुती उपाय करतील चमत्कार

प्रत्येकाला सुंदर लांब आणि घनदाट केस हवे असतात. त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आयुर्वेदानुसार, काही असे उपाय सांगितले आहेत ज्यांचा घरच्या घरी उपयोग करता येईल.

hair tips in marathi  आता दुतोंडी केसांपासून मिळवा मुक्ती हे सोपे घरगुती उपाय करतील चमत्कार

How To Get Rid Of Split End Hair: प्रत्येकाला सुंदर, लांब आणि घनदाट केस हवे असतात. त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. केसांची काळजी घेण्यासाठी लोक खूप काही करत असतात. आपल्यालाही कोणाचे सुंदर केस दिसले की कौतुक वाटते. आपलेही केस तसे असावेसे वाटते. केसांची योग्य काळजी नाही घेतली तर केस गळणे, केस तुटणे, केस पांढरे होणे, केस दुभंगणे (स्प्लिट एण्डस्) अनेक समस्या उद्भवतात. आज केस दुभंगणे किंवा स्प्लिट एण्डस् यावर आयुर्वेदिक उपाय काय आहेत, हे जाणून घेऊ..

प्रत्येकाला सुंदर लांब आणि घनदाट केस हवे असतात. त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आयुर्वेदानुसार, काही असे उपाय सांगितले आहेत ज्यांचा घरच्या घरी उपयोग केल्यामुळे तुमच्या केसांना अनेक फायदे होतील आणि त्यासोबतच स्प्लिट एण्डसची समस्या दूर होण्यास मदत होईल. स्प्लिट एंड्स ही केसांसाठी एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे केस निर्जीव, खराब आणि निस्तेज दिसतात. पण अनेकांना वाटते की, केस कापल्यानंतरच दुतोंडी केस कमी होऊ शकतात. मात्र, थोडी काळजी आणि योग्य टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे केस निरोगी, चमकदार आणि सुंदर ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला केस न कापता स्प्लिट एंड्स टाळण्यासाठी प्रभावी टिप्स सांगत आहोत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

हेही वाचा - Food Combinations To Avoid: मासे हेल्दी, पण काही कॉम्बिनेशन्स ठरू शकतात घातक; जाणून घ्या

बदलत्या जीवनशैलीमुळे केसांवर परिणाम

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे केस ड्राय आणि खराब दिसू लागतात. केसांची योग्य काळजी घेतल्यामुळे केस अधिक चमकदार आणि दाट होतात. बदलत्या ऋतूमध्ये शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्यावर त्याचा आरोग्यावर आणि केसांवर गंभीर परिणाम दिसून येतो. वातावरणातील आर्द्रतेमुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. कोरड्या केसांमुळे अनेकदा स्प्लिट एण्डसची समस्या उद्भवू शकते. या समस्येमुळे केसांची टोके दुभंगतात, केसांची वाढ होत नाही, केस निर्जीव झाल्यासारखे वाटू लागतात आणि तुटतात. तसेच, केसांमध्ये गुंता होतो. केसांमध्ये गुंता झाल्यामुळे केसगळतीची समस्या देखील होऊ शकते. केसांची आणि डोक्याच्या त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे कोंड्याची समस्या उद्भवते.

स्प्लिट एण्डसची समस्या रोखण्यासाठी अनेकजण वारंवार केस कापतात. परंतु, हा त्यावरचा उपाय नाही. कोरड्या आणि दुभंगलेल्या केसांचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चरायझेशनची कमतरता. जर तुम्हीही स्प्लिट एण्डसच्या समस्येने त्रस्त असाल तर काही सोप्या आणि घरगुती उपायांमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. हे उपाय केल्यामुळे तुमची स्प्लिट एण्डसची समस्या तर दूर होतीलच; परंतु, तुमचे केस देखील निरोगी राहाण्यास मदत होईल.

केसांना हळूवार हाताळा
केसांना नाजूकपणे हाताळा. केस टॉवेलने जोरजोरात घासून कोरडे करू नका, कारण यामुळे ओले केस सहजपणे तुटतात. त्याऐवजी मायक्रोफायबर टॉवेलने किंवा जुन्या टी-शर्टने केसांना हळूवारपणे कोरडे करा. गुंता काढताना, मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर करा आणि हळुवारपणे विंचरा.

केसांना मॉइश्चरायझ करण्यासाठी हे करा
- केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी, त्यांना योग्यरीत्या मॉइश्चरायझ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आठवड्यातून किमान दोनदा केसांना तेल लावा.
- जर तुमचे केस खूप कोरडे असतील तर कोमट खोबरेल तेल, बदाम तेल, जोजोबा किंवा आर्गन ऑईल लावा.
- केस धुण्यापूर्वी, टाळू आणि केसांच्या लांबीवर हलकेच तेल लावा. यामुळे केसांना खोल पोषण मिळेल आणि बराच काळ ओलावा टिकून राहील. हेअर मास्क वापरा.

केसांचे सुरक्षित स्टाईलिंग करा
वेणी घालणे, अंबाडा घालणे किंवा सैल पोनीटेल घालणे यांसारख्या स्टाईल्समुळे केसांचे टोके बाहेरील नुकसान आणि घर्षणापासून वाचतात. केस घट्ट बांधणे टाळा, कारण यामुळे केस तुटतात. रात्री झोपताना सिल्क किंवा सॅटिनची उशी वापरा किंवा सॅटिनची टोपी घाला, ज्यामुळे घर्षण कमी होईल आणि केस गुळगुळीत राहतील.

या गोष्टी टाळा
- स्ट्रेटनर, कर्लर किंवा ब्लो-ड्रायरचा वारंवार वापर टाळा. कारणे यामुळे केसांमधील मॉइश्चरायझेशन कमी होतं. 
- केसांच्या स्टाइलिंग टूल्सचा वापर शक्य तितका कमी करावा.
- आवश्यक असल्यास, गरम साधने वापरण्यापूर्वी उष्णता संरक्षणात्मक स्प्रे लावा.
- केसांना रंग देणे, रिबॉन्डिंग करणे किंवा केमिकल ट्रीटमेंट करणे टाळावे. कारण यामुळे केस कमकुवत होऊ शकतात.
- केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पार्लरमध्ये अशा अनेक ट्रिटमेंट उपलब्ध आहेत, ज्यांच्यामुळे केस काही काळासाठी चमकदार होतात. परंतु, या ट्रिटमेंटच्या दरम्यान केसांवर अनेक रसायनिक पदार्थांचा वापर केला जातो. याचा केसांच्या आरोग्यावर बऱ्याच काळासाठी गंभीर परिणाम होतो.

केसांचे आरोग्य केवळ बाह्य काळजीवर अवलंबून नाही, तर पोषण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी हे करा..
- केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून तीन ते साडेतीन लिटर पाणी प्या.
- आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वे समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा.
- डाळी, हिरव्या भाज्या, सोयाबीन, अंडी, काजू आणि ताजी फळे खा.
- चुकीच्या पद्धतीने केस धुणे आणि वाळवणे देखील स्प्लिट एंड्सची समस्या वाढवू शकते.
- अनेकदा लोक केसांना जोरात घासून धुतात, पण असे केल्याने केस कमकुवत होतात.
- केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी नेहमी सल्फेट-मुक्त शाम्पू आणि कंडिशनर वापरा.
- जेव्हा तुमचे केस पूर्णपणे कोरडे असतील तेव्हाच ते विंचरा कारण ओले केस जास्त तुटतात.

हेही वाचा - High BP Treament Tool: आता ऑनलाइन टूल्सद्वारे काही मिनिटांत करता येणार उच्च रक्तदाबावर उपचार

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री