How To Get Rid Of Split Ends: प्रत्येकाला सुंदर, लांब आणि घनदाट केस हवे असतात. त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. केसांची काळजी घेण्यासाठी लोक खूप काही करत असतात. आपल्यालाही कोणाचे सुंदर केस दिसले की कौतुक वाटते. आपलेही केस तसे असावेसे वाटते. केसांची योग्य काळजी नाही घेतली तर केस गळणे, केस तुटणे, केस पांढरे होणे, केस दुभंगणे (स्प्लिट एण्डस्) अनेक समस्या उद्भवतात. आज केस दुभंगणे किंवा स्प्लिट एण्डस् यावर आयुर्वेदिक उपाय काय आहेत, हे जाणून घेऊ..
प्रत्येकाला सुंदर लांब आणि घनदाट केस हवे असतात. त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आयुर्वेदानुसार, काही असे उपाय सांगितले आहेत ज्यांचा घरच्या घरी उपयोग केल्यामुळे तुमच्या केसांना अनेक फायदे होतील आणि त्यासोबतच स्प्लिट एण्डसची समस्या दूर होण्यास मदत होईल.
हेही वाचा - Eat A Tomato Everyday: दररोज रिकाम्या पोटी टोमॅटो खा.. मधुमेहासह या 3 समस्या होतील गायब
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे केस ड्राय आणि खराब दिसू लागतात. केसांची योग्य काळजी घेतल्यामुळे केस अधिक चमकदार आणि दाट होतात. बदलत्या ऋतूमध्ये शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्यावर त्याचा आरोग्यावर आणि केसांवर गंभीर परिणाम दिसून येतो. वातावरणातील आर्द्रतेमुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. कोरड्या केसांमुळे अनेकदा स्प्लिट एण्डसची समस्या उद्भवू शकते. या समस्येमुळे केसांची टोके दुभंगतात, केसांची वाढ होत नाही, केस निर्जीव झाल्यासारखे वाटू लागतात आणि तुटतात. तसेच, केसांमध्ये गुंता होतो. केसांमध्ये गुंता झाल्यामुळे केसगळतीची समस्या देखील होऊ शकते. केसांची आणि डोक्याच्या त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे कोंड्याची समस्या उद्भवते.
स्प्लिट एण्डसची समस्या रोखण्यासाठी अनेकजण वारंवार केस कापतात. परंतु, हा त्यावरचा उपाय नाही. कोरड्या आणि दुभंगलेल्या केसांचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चरायझेशनची कमतरता. जर तुम्हीही स्प्लिट एण्डसच्या समस्येने त्रस्त असाल तर काही सोप्या आणि घरगुती उपायांमुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. हे उपाय केल्यामुळे तुमची स्प्लिट एण्डसची समस्या तर दूर होतीलच; परंतु, तुमचे केस देखील निरोगी राहाण्यास मदत होईल.
केसांना मॉइश्चरायझ करण्यासाठी हे करा
- केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी, त्यांना योग्यरीत्या मॉइश्चरायझ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आठवड्यातून किमान दोनदा केसांना तेल लावा.
- जर तुमचे केस खूप कोरडे असतील तर कोमट खोबरेल तेल, बदाम किंवा आर्गन ऑईल लावा.
- केस धुण्यापूर्वी, टाळू आणि केसांच्या लांबीवर हलकेच तेल लावा. यामुळे केसांना खोल पोषण मिळेल आणि बराच काळ ओलावा टिकून राहील. हेअर मास्क वापरा.
या गोष्टी टाळा
- स्ट्रेटनर, कर्लर किंवा ब्लो-ड्रायरचा वारंवार वापर टाळा. कारणे यामुळे केसांमधील मॉइश्चरायझेशन कमी होतं.
- केसांच्या स्टाइलिंग टूल्सचा वापर शक्य तितका कमी करावा.
- आवश्यक असल्यास, गरम साधने वापरण्यापूर्वी उष्णता संरक्षणात्मक स्प्रे लावा.
- केसांना रंग देणे, रिबॉन्डिंग करणे किंवा केमिकल ट्रीटमेंट करणे टाळावे. कारण यामुळे केस कमकुवत होऊ शकतात.
- केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पार्लरमध्ये अशा अनेक ट्रिटमेंट उपलब्ध आहेत, ज्यांच्यामुळे केस काही काळासाठी चमकदार होतात. परंतु, या ट्रिटमेंटच्या दरम्यान केसांवर अनेक रसायनिक पदार्थांचा वापर केला जातो. याचा केसांच्या आरोग्यावर बऱ्याच काळासाठी गंभीर परिणाम होतो.
केसांचे आरोग्य केवळ बाह्य काळजीवर अवलंबून नाही, तर पोषण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी हे करा..
- केसांना हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून तीन ते साडेतीन लिटर पाणी प्या.
- आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वे समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा.
- डाळी, हिरव्या भाज्या, सोयाबीन, अंडी, काजू आणि ताजी फळे खा.
- चुकीच्या पद्धतीने केस धुणे आणि वाळवणे देखील स्प्लिट एंड्सची समस्या वाढवू शकते.
- अनेकदा लोक केसांना जोरात घासून धुतात, पण असे केल्याने केस कमकुवत होतात.
- केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी नेहमी सल्फेट-मुक्त शाम्पू आणि कंडिशनर वापरा.
- जेव्हा तुमचे केस पूर्णपणे कोरडे असतील तेव्हाच ते विंचरा कारण ओले केस जास्त तुटतात.
हेही वाचा - High BP: हल्ली तरुण वयातच का होऊ लागलाय उच्च रक्तदाब? तज्ज्ञांनी सांगितलं या 'सायलेंट किलर' आजारावर नियंत्रण कसं ठेवावं
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)