मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोर्चाला राज्यभरातील मराठ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभाग दर्शवला आहे. दरम्यान, काल सुरू झालेल्या या एकदिवसीय आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी मिळाली. तर शनिवारी पुन्हा एकदा आंदोलनाला उद्याच्या दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. सरकारनं मराठ्यांना आरक्षण देणारा जीआर काढावा, अन्यथा इथून हलणार नाही, असे जरांगे म्हणाले. तसेच आम्हाल गोळ्या घातल्या तरी मुंबईतून जाणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.